आपली त्वचा नितळ आणि चमकदार असावी असं आपल्याला कायम वाटतं. पण कधी त्वचेवरील फोडांमुळे तर कधी सुरकुत्यांमुळे आपला चेहरा निस्तेज आणि वयस्कर दिसतो. भारतीय हवामान, वाढते प्रदूषण, अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या पद्धती, ताणतणाव यांमुळे चेहरा खराब होतो. मग चेहरा चांगला दिसावा यासाठी आपण विविध प्रकारचे केमिकल प्रॉडक्ट वापरतो. इतकेच नाही तर पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंटही करतो. मात्र तरीही त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. कोरीयन किंवा जपानी महिलांची त्वचा अतिशय नितळ आणि चमकदार असते. यामागे नेमके काय कारण असावे. जगभरात प्रसिद्ध असलेला कोरीयन ब्यूटी ट्रेंड काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण कोरीयन ब्यूटीमधील काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेणार आहोत. ासाठी चेहरा स्वच्छ करण्याच्या १० स्टेप्स आणि नैसर्गिकरित्या चेहऱ्यावर चमक यावी यासाठी काय करता येईल असे काही उपाय पाहूया (Korean Beauty Tips for Glowing Skin)..
चमकदार त्वचेसाठी १० पायऱ्या
१. क्लिंजरने चेहरा स्वच्छ धुणे
२. तेलाचा किंवा फोमचा अंश असलेल्या क्लिंजरने चेहरा धुणे
३. एक्सफॉलिएशन
४. टोनर
५. इसेन्स
६. सिरम
७. शिट मास्क
८. आय क्रिम
९. मॉइश्चरायजर
१०. सनस्क्रिन
नैसर्गिक उपाय
१. राईस वॉटर
भिजवलेल्या तांदळाचे पाणी हा कोरीयन स्कीन केअर रुटीनमधील एक महत्त्वाचा घटक आहे. या पाण्यामुळे त्वचेतील कोलेजनची निर्मिती वाढते. कोलेजनमुळे त्वचा जास्त तुकतुकीत आणि तरुण दिसण्यास मदत होते असल्याने राईस वॉटरचा सौंदर्यासाठी फार पूर्वीपासून वापर करण्यात येतो. सूर्यापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठीही हे पाणी अतिशय फायदेशीर ठरते.
२. कोरफडीचा गर
आयुर्वेदात कोरफडीला खूप महत्त्व आहे. औषधी गुणधर्म असलेली कोरफड त्वचा आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर असते. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरते.
३. मध
मध हा नैसर्गिकरित्या तयार होणारा त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असणारा घटक आहे. मधामध्ये त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास उपयुक्त असणारे घटक असल्याने सौंदर्यासाठी आणि त्वचा तजेलदार होण्यासाठी मधाचा उपयोग होतो.
४. व्हिटॅमिन सी आणि इ सिरम
या दोन्ही व्हिटॅमिन्समुळे त्वचा उजळ तर होतेच पण त्वचेवरील काळे डाग, सुरकुत्या जाण्यास या सिरमचा चांगला उपयोग होतो. हे दोन्ही घटक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करत असल्याने त्वचेसाठी ते उपयुक्त ठरतात. या घटकांमुळे कोलेजनची निर्मिती होते आणि त्वचेचा पोट सुधारण्यास मदत होते.
५. स्टीम मसाज
पार्लरमधले महागडे फेशियल करण्यापेक्षा घरच्या घरी वाफेने मसाज घेतल्यास चेहऱ्याची रंध्रे उघडतात आणि व्हाइटहेडस आणि ब्लॅकहेडस निघून जाण्यास मदत होते. असा मसाज आपण घरी सहज घेऊ शकतो ज्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते.
या सगळ्या उपायांबरोबरच चेहरा सुंदर दिसावा यासाठी भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे, आहार चांगला असणे आणि झोपेच्या वेळा सांभाळणे आवश्यक असते. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत या गोष्टींचा समावेश करा.