Lokmat Sakhi >Beauty > केस वाढतच नाही-नुसते गळतात? कोरियन मुलींच्या दाट केसांचं सिक्रेट, १ उपाय-लांब होतील केस

केस वाढतच नाही-नुसते गळतात? कोरियन मुलींच्या दाट केसांचं सिक्रेट, १ उपाय-लांब होतील केस

Korean Care Tips For Long Hairs :केसांना चमक येण्यासाठी तुम्ही या स्प्रे चा वापर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 02:19 PM2024-02-26T14:19:53+5:302024-02-26T14:27:01+5:30

Korean Care Tips For Long Hairs :केसांना चमक येण्यासाठी तुम्ही या स्प्रे चा वापर करू शकता.

Korean Care Tips For Long Hairs : Home Remedies For Long Hairs How To Get Long Hairs | केस वाढतच नाही-नुसते गळतात? कोरियन मुलींच्या दाट केसांचं सिक्रेट, १ उपाय-लांब होतील केस

केस वाढतच नाही-नुसते गळतात? कोरियन मुलींच्या दाट केसांचं सिक्रेट, १ उपाय-लांब होतील केस

भारतात कोरियन ब्युटी हॅक्स (Korean Beauty Hacks) मोठ्या प्रमाणात ट्राय केले जातात. (Beauty Tips) कोरियन मुली चमकदार स्किन आणि स्ट्रेट केसांसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. बाजारात बरेच हेअर केअर प्रोडक्टस मिळतात. पण तुम्ही जर कोणताही नैसर्गिक उपाय करण्याच्या प्रयत्नात असाल तर  घरगुती साहित्य फायदेशीर ठरेल. (Home Remedies For Hair Growth)

यामुळे केसांची वाढ चांगली होईल. कोरियन हेअर केअर होम रिमेडीच्या वापराने तुम्हाला दाट-लांबसडक केस मिळण्यास मदत होईल. (Hair Care Tips) कोरियन उपाय तुमच्या केसांच्या चांगल्या वाढीसाठी फायदेशीर ठरतील. हे साहित्य तुम्हाला घरच्याघरी उपलब्ध होईल. याचे फायदे समजून घेऊ. (Korean Care Tips For Long Hairs)

कोरियन हेअर जेल घरच्याघरी कसे तयार करायचे? (How to Make Hair  Gel at Home)

कोरियन हेअर जेल तयार करण्यासाठी तुम्हाला ५ मोठे चमचे एलोवेरा जेल, दीड कप ग्रीन टीचे पाणी, ५ थेंब पेपरमेंट ऑईल हे साहित्य लागेल. सगळ्यात आधी एलोवेराची ताजी पानं १ तासासाठी पाण्यात भिजवून  ठेवा. त्यानंतर एलोवेराच्या  पानांतून बाहेर येणारा पिवळा पदार्थ बाहेर काढून पाण्यात ठेवा.

रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम

एलोवेरा जेलमध्ये ग्रीन टी चे पाणी आणि पेपरमिंट तेलाचे काही थेंब घाला.त्यानंतर हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हा स्प्रे वापरून तुम्ही नियमित केसांची मसाज करू शकता.  हे मिश्रण एका स्प्रे  बॉटलमध्ये भरा. हा स्प्रे नियमित केसांच्या मुळांना लावा. यामुळे केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होईल.

हा स्प्रे केसांच्या वाढीसाठी उत्तम ठरतो. दुसऱ्या दिवशी केस व्यवस्थित  धुवून घ्या. कारण एलोवेरा जेलमध्ये प्राकृतिक मॉईश्चरायजिंग गुण असतात. ज्यामुळे केसांमध्ये हलका मपऊपणा येतो. हा स्प्रे लावल्यानंतर केस धुतल्यास केसांवर चमक येईल आणि केसांना चांगले वॉल्यूम मिळेल.

कोरियन हेअर स्प्रे चे फायदे (Benefits Of Korean Hair Spray)

१) जर तुम्हाला केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या उद्भवत असेल तर तुम्ही कोरियन हेअर स्प्रेचा वापर करून ही समस्या टाळू शकता.  या स्प्रेमध्ये  एलोवेरा जेल असते. ज्यामुळे केस मॉईश्चराईज  राहतात. 

२) जर तुमच्या केसांमध्ये  उवा झाल्या असतील तर हा हेअर  स्प्रे फायदेशीर ठरेल. यात पेपरमिंट ऑईल असते. ज्यात एंटी बॅक्टेरिअल, एंटी फंगल गुण असतात.

३)  जर स्काल्पवर खाज येत असेल किंवा संक्रमण किंवा सूज आली असेल तर या समस्येपासून सुटका  मिळवण्यासाठी तुम्ही या स्प्रे चा वापर करू शकता. पेपरमिंटमध्ये एंटीइंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे स्काल्पची त्वचा चांगली राहते. 

४) केसांना चमक येण्यासाठी तुम्ही या स्प्रे चा वापर करू शकता. या स्प्रेममध्ये तुम्ही ग्रीन टी चा वापर करू शकता. केसांचा डलनेस दूर होतो आणि  केस चमकदार बनतात.

पोटाची चरबी जास्त सुटलीये-वजन घटत नाही? सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पाणी प्या; स्लिम, मेंटेन राहाल

५) एलोवेरा जेलमुळ केसांना फाटे फुटण्याची समस्या उद्भवत नाहीत.  हा स्प्रे लावल्याने केसांमध्य कोरडेपणा येत नाही आणि स्काल्प हायड्रेट राहतो. 

Web Title: Korean Care Tips For Long Hairs : Home Remedies For Long Hairs How To Get Long Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.