Join us  

चेहऱ्यावर कमालीचा ग्लो आणणारा कोरियन फेसमास्क! फक्त २ पदार्थ चेहऱ्यावर चोळा- त्वचा चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 4:43 PM

Korean Face mask For Amazing Glow On Skin: त्वचेवर खूप छान ग्लो मिळवायचा असेल आणि तो सुद्धा अगदी घरच्याघरी, कमीतकमी पैशांत तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा...(how to make korean face mask?)

ठळक मुद्देत्वचेवर या उपायाचा खूप छान परिणाम दिसून येण्यासाठी आठवड्यातून एकदा न चुकता हा उपाय नियमितपणे करा. पार्लरमध्ये जाऊन फेशियल किंवा क्लीनअप करण्याची गरजच पडणार नाही. 

कामाच्या धावपळीत आपण एवढे अडकून गेलेलो असतो की चेहऱ्याची पुरेशी काळजी घ्यायला वेळ मिळतच नाही. शिवाय आपली रोजची दगदग सुरूच असते. त्यातच धूळ, धूर, प्रदूषण, ऊन यांचा परिणामही त्वचेवर होतोच. त्यामुळे मग त्वचेची पुरेशी काळजी घेतली नाही, तर त्वचा डल दिसते, पिगमेंटेशन येतात, डेड स्किनचे प्रमाण वाढते. म्हणूनच अशा रापलेल्या त्वचेला घरच्याघरी एकदम झकास चमक द्यायची असेल (korean facemask for amazing glow on skin) तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा.. (how to get young, radiant glowing skin?)

 

त्वचेवर छान चमक येण्यासाठी सोपा घरगुती उपाय 

त्वचेवर छान चमक येण्यासाठी घरच्याघरी कोणता उपाय करावा, याची माहिती rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

हा उपाय करण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. त्या कढईमध्ये थोडेसे पाणी टाका. 

सणासुदीला अन्नधान्यातली भेसळ वाढते! म्हणूनच हळदीची शुद्धता ओळखण्यासाठी पाहा ३ सोप्या टिप्स

पाणी थोडे गरम झाले की त्यात २ चमचे तांदळाचे पीठ टाका आणि हे मिश्रण शिजवायला ठेवा. शिजवताना ते वेळोवेळी हलवा.

त्यानंतर जेव्हा हे मिश्रण थोडे घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा आणि तांदळाच्या पिठाची पेस्ट थंड झाल्यानंतर त्यात दोन चमचे मध टाका.

 

आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि त्याचा लेप तुमच्या चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर लावा.

साधारण १० ते १५ मिनिटांनी हलक्या हाताने चोळून चेहरा धुऊन टाका. 

पालकाची भाजी खायला मुलं नाही म्हणतात? भाग्यश्रीची रेसिपी पाहून करा पालक लबाबदार- सगळ्यांनाच आवडेल

हा उपाय केल्यानंतर त्वचेवरची डेड स्किन, टॅनिंग निघून जाईल आणि त्वचा खूप स्वच्छ, नितळ, चमकदार होईल. 

त्वचेवर या उपायाचा खूप छान परिणाम दिसून येण्यासाठी आठवड्यातून एकदा न चुकता हा उपाय नियमितपणे करा. पार्लरमध्ये जाऊन फेशियल किंवा क्लीनअप करण्याची गरजच पडणार नाही. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी