Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावर तेज कसं आणायचं? १ चमचा तांदळांचा जादूई उपाय; ५ मिनिटांत टॅनिंग निघेल-सुंदर दिसाल

चेहऱ्यावर तेज कसं आणायचं? १ चमचा तांदळांचा जादूई उपाय; ५ मिनिटांत टॅनिंग निघेल-सुंदर दिसाल

Korean Glass Skin Cream Homemade : घरच्याघरी सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरीच ही क्रीम बनवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 03:26 PM2024-01-19T15:26:46+5:302024-01-19T15:59:29+5:30

Korean Glass Skin Cream Homemade : घरच्याघरी सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरीच ही क्रीम बनवू शकता.

Korean Glass Skin Cream Homemade : The Best Way To Make Korean Skin Whitening Rice Cream | चेहऱ्यावर तेज कसं आणायचं? १ चमचा तांदळांचा जादूई उपाय; ५ मिनिटांत टॅनिंग निघेल-सुंदर दिसाल

चेहऱ्यावर तेज कसं आणायचं? १ चमचा तांदळांचा जादूई उपाय; ५ मिनिटांत टॅनिंग निघेल-सुंदर दिसाल

धूळीच्या संपर्कात आल्यामुळे किंवा उन्हात गेल्यामुळे चेहरा काळवंडतो. (Beauty Tips) स्किन व्हाईटनिंग किंवा त्वचेवर ग्लो आणण्यासाठी फेस क्रिमचा वापर केला जातो. (Korean Glass Skin Cream Homemade) तुम्हालाही कोरियन ग्लास स्किन मिळवायची असेल तर तुम्ही स्किन व्हाईटनिंग क्रिमचा वापर करू शकता. (Secret Glass Skin Formula Cream) तुम्हाला बाजारात जाऊन ही क्रिम विकत घेण्याची काही गरज नाही. घरच्याघरी सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरीच ही क्रीम बनवू शकता. (The Best Way To Make Korean Skin Whitening Rice Cream)

कोरियन ग्लास स्किन मिळवण्यासाठी जर तुम्हाला घरगुती क्रिम बनवायची असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने बनवू शकता. त्यासाठी एका वाटीत तांदूळ घ्या. (Winter Special Cream) त्यात पाणी घालून २ तासांसाठी भिजवायला ठेवा. त्यात एलोवेरा जेल घाला, २ चमचे रोज वॉटर, २ चमचे तांदळाचे पाणी, २ चमचे नारळाचे तेल घाला. एकजीव करून ही पेस्ट एका बाटलीत भरा. तयार आहे कोरियन तांदळाची क्रिम. ही क्रिम तुम्ही रात्री किंवा सकाळी चेहऱ्याला लावू शकता. 

पोट सुटलं-मांड्या जाडजूड दिसतात? थंडीत पपईच्या २-३ फोडी खा, सुटलेलं पोट होईल कमी

कोरियन फेस क्रिम बनवण्याची दुसरी पद्धत 

स्किन व्हाईटनिंग क्रिम बनवण्यासाठी सगळ्यात आधी तांदळाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तांदळाचे पाणी कमीत कमी १ तासासाठी भिजवून ठेवा. जवळपास १ तासानंतर तांदळातून पाणी वेगळे करा. नंतर तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित वाटून घ्या.  तांदळाच्या या पेस्टमध्ये १ चमचा एलोवेरा, २ चमचे गुलाब पाणी आणि थोडं नारळाचे तेल घाला. एका चमच्याच्या मदतीने सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा. ही स्किन व्हाईटनिंग क्रिम तुम्ही काचेच्या एका छोट्या डबीत ठेवू शकता. 

कोरियन क्रिम त्वचेवर कशी लावावी?

चेहऱ्यावर क्रिम लावताना सगळ्यात आधी त्वचा व्यवस्थित स्वच्छ करा. जेणेकरून त्वचेत जमा झालेली घाण, धूळ व्यवस्थित साफ होईल. टॉवेलच्या साहाय्याने चेहरा व्यवस्थित पुसून घ्या.  नंतर बोटांवर थोडी क्रिम घेऊन संपूर्ण चेहऱ्याला लावा. त्यानंतर चेहऱ्याची व्यवस्थित मसाज करा. ही क्रिम रात्रभर चेहऱ्याला लावलेली राहू द्या. रोज या क्रिमचा वापर केल्यास  चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल.

या स्किन व्हाइटनिंग क्रिममध्ये एलोवेरा जेल घालून तुम्ही याचा वापर करू शकता. हे जेल त्वचेला मॉईश्चराईज ठेवेल याचा वापर केल्याने त्वचेवर सुरकुत्या येणार नाहीत आणि हलके डागही येणार नाहीत. गुलाबपाण्याच्या वापराने त्वचा हायड्रेट राहते. गुलाब पाण्यात एंटी एजिंग गुण असतात. ज्यामुळे चेहऱ्याला वयाआधीच खराब होण्यापासून वाचवता येईल. स्किन इरिटेशन आणि रेडनेस कमी होते. गुलाबपाणी फायदेशीर ठरते. 

सकाळी भाजलेल्या लसणाची १ पाकळी खा; कोलेस्टेरॉल बाहेर निघेल-म्हातारपणातही निरोगी राहाल

ही तांदळापासून तयार झालेली क्रिम असून त्वचेवर तांदळाचा वापर केल्यास त्वचा हेल्दी आणि ग्लोईंग राहण्यास मदत होते. ज्यामुळे स्किन डॅमेज होत नाही. जेव्हाही तुम्ही उन्हात बाहेर पडाल तेव्हा चेहऱ्याला ही क्रिम लावून बाहेर निघू शकता.  त्वचेला सॉफ्ट आणि मॉईश्चराईज बनवण्यासाठी तुम्ही स्किन व्हाईटनिग क्रिमचा वापर करू शकता. 

Web Title: Korean Glass Skin Cream Homemade : The Best Way To Make Korean Skin Whitening Rice Cream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.