Join us  

केसांची वाढ खुंटली-पातळ दिसतात? तांदळाच्या पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून लावा; दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:42 AM

Korean Hair Care Routine To Improve Hair Health (Rice Water Home Remedies For Hair Care): तांदळाच्या पाण्यात इनोसिटोल असते जे एक प्रकारचे कार्बोहायड्रेट्स असतात.  ज्यामुळे डॅमेज केस रिपेअर होण्यास मदत होते.

केस मोकळे सोडल्यमुळे, धूळ-प्रदूषण यांमुळे केसांच्या समस्या सर्रास उद्भवतात. केस गळू नयेत यासाठी काही घरगुती फायदेशीर ठरू शकतात. (Skin Care Tips) कोरियन हेअर केअर रूटीनचा अनेकजण आपल्या रूटीनमध्ये समावेश करतात. कमी मेहनतीत कमीत कमी खर्चात काही तांदळाच्या पाण्याचा वापर करून तुम्ही लांबसडक केस मिळवू शकता. बदलत्या लाईफस्टाईलमध्ये आजकाल हेअर केअर रूटीनचा समावेश करायाल हवा. अशात कोरियन  हेअर केअर रूटीनचा समावेश करा.  ब्युटी एक्सपर्ट्सनी तांदळाच्या पाण्याच्या वापराबाबत सोपा उपाय सांगितले आहेत. (Korean Secrets For Long Hair)

संशोधनानुसार जपानमधील हियान काळातील महिलांचे केस फरशीपर्यंत लांब असायचे. या महिला केसांच्या वाढीसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करत असतं. (Ref) चीनमधील हुंआगुओ नावाच्या गावात राहणाऱ्या महिलांच्या केसांची लांबी सरासरी ६ फूट आहे. या महिलांच्या केसांचा रंगही जास्तवेळ टिकून राहतो. या महिला केसांवर तांदळाच्या पाण्याचा वापर करतात. (Effective Korean Hacks For Healthy Hair)

ऐन तारूण्यात कंबरदुखीने हैराण आहात? ५ पदार्थ खा; म्हातारे झालात तरी कंबरदुखी छळणार नाही

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तांदळाचे पाणी कसे फायदेशीर ठरते? (Rice Water For Long Hairs)

तांदळाच्या पाण्यात इनोसिटोल असते जे एक प्रकारचे कार्बोहायड्रेट्स असतात.  ज्यामुळे डॅमेज केस रिपेअर होण्यास मदत होते. आणि केसांच्या वाढीलाही चालना मिळते. याचा पीएच स्तर केसांच्या पीएच स्तरांशी जोडलेला असतो. ज्यामुळे केस गळणं केस तुटणं अशा  समस्या टाळण्यास मदत होते. 

तांदळाच्या  पाण्याबरोबर एलोवेरा जेल लावण्याचे फायदे

एलोवेरा जेलमध्ये व्हिटामीन ए, व्हिटामीन सी आणि व्हिटामीन बी असते.  यामुळे केसांना पोषण मिळते. एलोवेरा जेल मध्ये एंटी ऑक्सिडेंट्स असतात जे त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. एलोवेरा जेलमध्ये एंटी बॅक्टेरिअल  गुण असतात  ज्यामुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो. 

राग आला की जीभेवरचा ताबाच सुटतो? सद्गुरू सांगतात १ गोष्ट करा; राग येणारच नाही-आनंदी राहाल

केसांसाठी नारळाचे पाणी कसे बनवावे?

जवळपास २ रात्र आधी १ वाटी तांदूळ पाण्यात भिजवून ठेवा. १ रात्र आधी  एलोवेराची पानं  तोडून याचे जेल मिसळून लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी तांदळाचे पाणी आणि एलोवेरा जेल पाण्यातून वेगवेगळे गाळून घ्या. एका स्प्रे बॉटलमध्ये  अर्ध्यापेक्षा जास्त तांदळाचे पाणी आणि मेथीच्या दाण्याचे पाणी घाला.

स्प्रे च्या माध्यमातून तुम्ही केसांवर पाणी शिंपडू शकता.  जवळपास २ तासांनी केस शॅम्पू आणि कंडिशनरने स्वच्छ करा. हा घरगुती उपाय आठवड्यातून २ वेळा केल्यास केसांवर चांगला परिणाम दिसून येईल.  आठवड्यातून २ वेळा हा उपाय तुम्ही करू शकता. काही दिवसातंच केस लांबसडक झालेले दिसून येतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी