कोरियन ब्यूटी हॅक्स आणि कोरियन ब्यूटी प्रॉडक्ट्स हे दोन्ही आपल्या भारतात फारच फेमस आहेत. कोरियन मुलींची त्वचा आणि केस ज्यापप्रमाणे आकर्षक आणि सुंदर असतात त्याचप्रमाणे आपले केस आणि त्वचा असावी असे प्रत्येकीला वाटते. यासाठीच आपल्याकडे हे कोरियन उपाय अगदी आवडीने फॉलो केले जातात. कोरियन मुली आपल्या त्वचेप्रमाणेच केसांचीही विशेष काळजी घेतात आणि यासाठी केसांचे योग्य रूटीन अतिशय काटेकोरपणे पाळतात(Korean Head Spa Scalp Treatments).
कोरियन हेअर केअरमध्ये फक्त केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही तर केस निरोगी आणि सुंदर व्हावेत म्हणून अनेक उपाय केले जातात. कोरियन हेअर केअर ब्यूटी ट्रिटमेंटमध्ये वेगवेगळ्या ब्यूटी ट्रिक्सचा वापर केला जातो. कोरियन स्किन केअर सोबतच आता कोरियन हेअर केअर मध्ये हेड स्पा चा नवीन पर्याय सध्या खूपजणी फॉलो करताना दिसत आहे. कोरियन हेड स्पा मध्ये केस आणि स्कॅल्प या दोघांची खोलवर सफाई केली जाते. आपले केस आणि स्कॅल्पला हेल्दी ठेवण्यासाठी कोरियन हेड स्पा करणे फायदेशीर ठरते(Positive Effects of Korean Head Spa on Hair and Scalp Health).
१. कोरियन हेड स्पा म्हणजे काय ?
इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार , कोरियन हेड स्पामध्ये स्कॅल्पच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. यामध्ये स्कॅल्पची खोलवर स्वच्छता करणे, मसाज करणे, स्कॅल्पला मॉइश्चराईज करणे यांसारख्या अनेक प्रकारच्या उपचारांचा समावेश असतो.
२. कोरियन हेड स्पा करण्याचा मुख्य उद्देश काय ?
सध्याच्या काळात वाढते प्रदूषण, धूळ, माती यांसारख्या गोष्टींमुळे आपले केस आणि स्कॅल्पचे आरोग्य बिघडते. केस आणि स्कॅल्पचे आरोग्य बिघडले तर यामुळे त्यांचे सौंदर्य देखील कमी होते. यासाठीच स्कॅल्प व केसांवरील घाण आणि अशुद्धता दूर करणे हा या ट्रिटमेंटचा मुख्य उद्देश आहे.
फक्त १ टेबलस्पून चिया सीड्सचे करा केसांसाठी कंडिशनर- एका धुण्यात केस होतील सिल्की आणि चमकदार...
३. कोरियन हेड स्पा केल्याने नेमके काय होते ?
कोरियन हेड स्पा केल्याने डोक्यातील स्किनचा रक्तप्रवाह सुधारतो, स्कॅल्पची त्वचा निरोगी होते, यासोबतच केसांचा पोत देखील सुधारण्यास मदत होते. हेड स्पा करताना मसाज केल्याने रिलॅक्स वाटते.
४. कोरियन हेड स्पा किती केस आणि स्कॅल्पसाठी किती फायदेशीर आहे ?
या स्पामध्ये प्रामुख्याने स्कॅल्पवर लक्ष केंद्रित केले जाते, जेणेकरून केसांची निरोगी आणि मजबूत वाढ होऊ शकेल. ही स्पा पद्धत तणाव कमी करण्यावर देखील लक्ष केंद्रित करते. या हेड स्पामध्ये ग्रीन टी, मगवॉर्ट आणि जिनसेंग यांसारख्या पारंपारिक कोरियन हर्बल घटकांचा वापर केला जातो. या नैसर्गिक गोष्टी स्कॅल्पचे पोषण करतात आणि केसांच्या मुळांना आतून मजबूत करतात. या हेड स्पा मध्ये मृत त्वचेच्या पेशी, कोंडा आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी स्कॅल्प स्केलिंग तंत्राचा वापर केला जातो, यामुळे स्कॅल्प निरोगी आणि हेल्दी राहण्यास मदत मिळते.
५. कोरियन हेड स्पा कसे केले जाते ?
सगळ्यात आधी स्कॅल्पचे अॅनॅलिसिस केले जाते. त्यानंतर स्कॅल्पचे क्लिनिंग केले जाते. यामध्ये स्कॅल्पवरील घाण, अतिरिक्त तेल इत्यादी क्लिंजिंग शॅम्पूने काढून टाकले जाते. त्यानंतर स्कॅल्प मसाज दिला जातो ज्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते. मसाजमध्ये, एक्यूप्रेशरद्वारे स्ट्रेस दूर केला जातो. पुढील उपचार स्कॅल्पच्या स्थितीवर अवलंबून असते. हायड्रेटिंग मास्क, सीरम, तेल लावले जाते. या हेअर प्रॉडक्ट्समध्ये जिनसेंग, ग्रीन टी आणि इतर हर्बल अर्क यासारखे पौष्टिक घटक असतात. कधीकधी या हेअर प्रॉडक्ट्सना स्कॅल्प आणि केसांमध्ये खोलवर जाण्यासाठी स्टीम ट्रिटमेंट देखील दिली जाते. शेवटी केस आणि स्कॅल्प स्वच्छ केले जातात. सगळ्यात शेवटी कंडिशनर किंवा सीरम लावले जाते.
नखं वाढतच नाहीत, वारंवार तुटतात? हे घ्या होममेड सुपर हेल्दी ऑईल-नखं चमकतील...