Join us  

कोरियन तरूणींच्या नितळ-सुंदर त्वचेचं सिक्रेट; रात्री झोपताना करा १ काम-चेहऱ्यावर ग्लो येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 5:00 PM

Korean Night Skin Care Routine (korean beauty secrets) : महिलांची त्वचा ग्लोईंग ठेवण्यासाठी तुम्ही डे स्किन केअर रुटीनप्रमाणे नाईट स्किन केअर रूटीन फॉलो करू शकता.

(Image Credit- You-tube)

त्वचा हेल्दी आणि ग्लोईंग दिसण्यासाठी तुम्ही कोरियन स्किन केअर रुटीन फॉलो  करू शकता. कोरियन महिलांची त्वचा आरश्याप्रमाणे चमकते. त्यांच्या चेहऱ्यावर एकही डाग दिसत नाही. वाढत्या वयातही त्या तरूण दिसून येतात. (Korean Night Skin Care Routine) महिलांची त्वचा ग्लोईंग ठेवण्यासाठी तुम्ही डे स्किन केअर रुटीनप्रमाणे नाईट स्किन केअर रूटीन फॉलो करू शकता. रात्री त्वचा मॉईश्चर शोषून घेते. याव्यतिरिक्त नवीन स्किन सेल्स जनरेट होतात. (Korean Skincare Routine)

कोरियन महिलांसारखी स्किन मिळवण्यासाठी तुम्हाला महागडी स्किन केअर उत्पादनं वापरण्याची काही गरज नाही. (korean beauty secrets) तुम्ही बेसिक नाईट स्किन केअर रूटीन फॉलो करू शकता, ग्लोईंग आणि चमकदार त्वचा मिळवण्यासााठी रात्रीच्या वेळेस चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची समजून घेऊ. (Korean Skin Care Routine Day and Night)

रात्री झोपण्याआधी चेहरा साफ करणं गरजेचं असतं. कोरियन महिला रात्री चेहऱ्याला क्लिंज करण्यासाठी क्लिजिंग ऑईलचा वापर करतात. क्लिजिंग ऑईलच्या मदतीने चेहऱ्यावर धूळ, घाण साफ करता येते. रात्रीच्यावेळी त्वचेत हे तत्व सहज शोषले जातात. म्हणूनच रात्री चेहऱ्याला मेकअप लावून झोपू नये.

चमचाभर दह्याने घरी करा फेशियल, ५०० ते हजार रूपये वाचतील-पार्लरशिवाय चेहरा दिसेल ग्लोईंग

चेहऱ्यावरील घाण स्वच्छ न केल्यामुळे ब्लॅकहेड्स आणि पिंपल्स येतात. म्हणूनच कोरियन महिला स्पॉटलेस आणि ग्लास स्किन क्लिजिंग ऑईलने फेस क्लिन करतात. तेल पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला व्यवस्थित मसाज करा, एका ओल्या कापडाने चेहरा व्यवस्थित पुसून घ्या. चेहऱ्यावरील घाण आणि मेकअप साफ होण्यास मदत होते.

त्वचा डबल क्लिंज का केली जाते

कोरियन नाईट स्किन केअरची दुसरी स्टेप स्किन क्लिंज करणं ही आहे. डबल क्लिंज हे कोरियन ग्लासी स्किनचं सिक्रेट आहे. चेहरा स्वच्छ करण्यासाठी  फोमिंग क्लिंजरचा उपयोग करतात. हातावर थोडं क्लिंजर घ्या आणि पाण्यात मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा.

रोज गळून केस पातळ झाले? सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितला दाट केसांसाठी खास उपाय

डबल क्लिजिंगनंतर चेहऱ्याला स्क्रब करा. आठवड्यात फक्त २ वेळा स्किन एकक्सफोलिएट करा. स्क्रब केल्याने सेल्स रिजनरेशन होतात. फक्त  दिवसाच नाहीतर रात्रीही चेहऱ्यावर टोनर लावायला हवं. स्किनची पीएच लेव्हल बॅलेन्स करणं गरजेचं आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी