कोरियन ब्यूटी ट्रेण्डचा आपल्या सौंदर्योपचारात समावेश झाला आहे. कोरियन महिलांप्रमाणे त्वचा तरुण आणि नितळ करण्याचे उपाय अवलंबले जात आहे. तांदूळ हा कोरियन सौंदर्योपचारातला महत्त्वाचा घटक आहे. तांदळाचा वेगवेगळ्या पध्दतीने उपयोग करुन त्वचेच्या अनेक समस्या सहज सोडवल्या जातात. राइस क्रीमद्वारे त्वचेच्या निरनिराळ्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. हे राइस क्रीम बाहेर मिळत असलं तरी कमी खर्चात आणि कमी वेळात घरच्याघरी करता येतं. राइस क्रीमद्वारे चेहऱ्यावरील खड्डे भरुन निघतात आणि चेहरा नितळ दिसतो. राइस क्रीम हे केवळ एका घटकाचा वापर करुन तयार करता येतं. राइस क्रीममुळे त्वचा स्वच्छ होते. कारण राइस क्रीममुळे चेहऱ्यावरील खड्डे भरुन निघतात. खड्ड्यांमध्ये धूळ , प्रदूषित घटक साठून मुरुम पुटकुळ्या येतात. राइस क्रीममुळे चेहऱ्यावरील खड्डे भरुन निघतात आणि त्वचा निरोगी होते.
Image: Google
राइस क्रीम कसं करायचं?
राइस क्रीम तयार करण्यासाठी पांढऱ्या तांदळाची गरज असते. क्रीम बनवताना आधी तांदूळ स्वच्छ निवडून पाण्यानं धुवून घ्यावा. नंतर एक भांड्यात धुतलेले तांदूळ काढून त्यात पाणी घालून ते तासभर भिजवावे. तासाभरानं एका कढईत एक वाटी पाणी घालावं. या पाण्यात भिजवलेले तांदूळ पाण्यासह घालावेत.
Image: Google
गॅसची आच मध्यम ठेवून भात शिजू द्यावा. भात शिजताना चमच्यानं सतत ढवळत राहावा. तांदूळ एकदम शिजून त्याची पेजसारखी पेस्ट होईपर्यंत गॅस सुरु ठेवावा. तांदळाची पेस्ट झाल्यावर गॅस बंद करावा. एक भांडं घ्यावं. गाळणीनं भाताची पेस्ट गाळून घ्यावी. पेस्टमधलं पाणी या प्रक्रियेने निघून जाईल. गाळणीत असलेली पेस्ट म्हणजेच राइस क्रीम.
राइस क्रीम एका स्वच्छ डब्यात काढावी. हवाबंद डब्यात राइस क्रीम काढून ती फ्रिजमध्ये ठेवल्यास दोन आठवडे टिकते. राइस क्रीम थंड जागीच ठेवावी. उन्हाच्या, हवेच्या संपर्कात राइस क्रीम येणार नाही याची काळजी घ्यावी.
Image: Google
राइस क्रीम लावण्याचे फायदे
1. राइस क्रीम लावल्याने चेहऱ्यावरील खड्डे भरुन निघतात.
2. राइस क्रीम लावल्याने चेहऱ्यावरची चमक वाढते.
3. चेहऱ्यावरील डाग, मुरुम पुटकुळ्या, काळपटपणा निघून जातो.
4. चेहऱ्याचा रंग राइस क्रीममुळे उजळतो.
5. त्वचा निरोगी राहाण्यासाठी त्वचेचा पीएच लेव्हल नियंत्रित राहाणं आवश्यक असतो. राइस क्रीममुळे पीएच लेव्हल नियंत्रित राहातो.
6. राइस क्रीम लावल्यानं त्वचा सैल पडत नाही. त्यामुळे त्वचा घट्ट राहाते.
7. राइस क्रीममधील ॲण्टिऑक्सिडण्टस मुक्त मुलकांचा सामना करुन त्वचेचं रक्षण करतात. त्वचा चमकदार आणि सतेज ठेवतात.
Image : Google
राइस क्रीम कसं लावावं?
राइस क्रीम लावण्याआधी चेहरा क्लीन्जरनं स्वच्छ धुवावा. चेहरा रुमालानं टिपून घ्यावा. राइस क्रीम घेवून ती चेहऱ्यास लावावी. क्रीम लावताना मसाज करत लावावी. क्रीम पूर्णपणे त्वचेत शोषली जाईपर्यंत मसाज करावा. राइस क्रीम लावल्यानंतर चेहरा धुवू नये. धुवायचा असल्यास क्रीम लावून झाल्यानंतर एका तासानं साध्या पाण्यानं धुवावा.