आपली त्वचा कायम तजेलदार आणि ग्लोईंग असावी असं प्रत्येक महिलेला वाटतं. पण काही ना काही कारणाने त्वचेच्या तक्रारी निर्माण होतात आणि त्वचा खराब दिसते. कधी पोट साफ नसल्याने चेहऱ्यावर मुरूम येतात तर कधी तेलकटपणामुळे किंवा सतत सौंदर्यप्रसाधने वापरल्याने त्वचा खराब होते. चेहऱ्यावर डाग पडणे, सुरकुत्या येणे, त्वचा कोरडी होणे अशा काही ना काही तक्रारी आपण सतत करत असतो. जपानी किंवा कोरीयन तरुणींना पाहून आपल्याला त्यांच्या त्वचेचा हेवा वाटतो. मात्र त्यांची त्वचा इतकी नितळ असण्यामागे त्याठिकाणचे हवामान, त्यांचा आहार अशा बऱ्याच गोष्टी जबाबदार असतात. आपणही उत्तम आहार घेतला, पुरेशी झोप घेतली आणि नियमितपणे स्कीन केअर रुटीन फॉलो केले तर आपली त्वचा नितळ, सुंदर दिसू शकते (Korean Skin Care Home Remedy For Glowing Glass Skin).
केसांना लावण्यापलिकडे खोबरेल तेलाचे ५ जादूई फायदे माहिती आहेत का? केसांपासून टाचेपर्यंत सोपा उपाय
कसा करायचा उपाय?
१. एका बाऊलमध्ये २ चमचे तांदळाचे पीठ घ्यायचे.
२. त्यात १ चमचा मध आणि १ चमचा कोरफडीचा गर घालायचा.
३. अर्धा कप गुलाबपाणी आणि १ कप साधं पाणी घालून हे मिश्रण चांगले एकजीव करायचे.
४. हे पाणी फ्रिजरमध्ये असणाऱ्या आईस ट्रेमध्ये ओतायचे आणि फ्रिजरमध्ये ठेवून द्यायचे.
५. हे क्यूब फ्रिजरमधून काढून आठवड्यातून २ ते ३ वेळा चेहऱ्यावरुन फिरवायचे.
६. त्यानंतर चेहऱ्याला हलक्या हाताने स्क्रब करुन १० मिनीटे हे घटक चेहऱ्यावर तसेच ठेवायचे.
७. त्यानंतर चेहऱ्या पाण्याने धुतल्यावर त्वचा एकदम नितळ दिसते.
फायदे काय?
१. त्वचेला सुरकुत्या न पडता ती टाईट राहण्यासाठी याचा चांगला फायदा होतो.
२. त्वचेचा कोरडेपणा, निस्तेजपणा निघून जाऊन ती चमकण्यास मदत होते.
३. चेहऱ्यावरील फोड, डाग निघून जाण्यास याचा चांगला उपयोग होतो.