सध्या भारतात कोरियन फूड आणि कोरियन म्युझिक खूप लोकप्रिय आहे. गेल्या एक दोन वर्षांपासून कोरियन ब्यूटी बद्दलची उत्सुकता आपल्याकडील महिलांमधे वाढली आहे. कोरियन महिलांच्या सौंदर्याचं रहस्य त्यांच्या नियमांमध्ये दडलं आहे. हिवाळ्यात जशी आपली त्वचा कोरड्या हवामानामुळे खराब होते तसं कोरियन महिलांच्या बाबतीत होत नाही. कडक हिवाळ्यातही कोरियन महिलांची त्वचा चकाकते. मऊ मुलायम दिसते. यामागेही कोरियन महिला पाळत असलेले सौंदर्य नियमच आहे. हिवाळ्यासाठीचे त्या पाळत असलेले सौंदर्य नियम आपल्यालाही पाळणं आणि हिवाळ्यात आपली त्वचा जपणं सहज शक्य आहे.
Image: Google
काय आहेत कोरियन महिलांचे हिवाळ्यातसाठीचे सौंदर्य नियम?
1. कोरियन महिला हिवाळ्यात त्वचा मऊ ओलसर राहाण्यासाठी स्टीम बाथ ( वाफेची आंघोळ) घेतात. आठवड्यातून एकदा स्टीम बाथ घेऊन त्या आपली त्वचा हिवाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांपासून जपतात. स्टीम बाथ घेतांना त्वचा संवेदनशील होते, त्वचेवरची रंध्र उघडलेली असतात. अशा परिस्थितीत आपल्या त्वचेचं पोषण करण्यासाठी त्या स्टीम बाथ घेताना चेहऱ्याला आणि मानेला तेलयुक्त क्लीन्जरने 6-7 मिनिटं मसाज करतात.
Image: Google
2. हिवाळ्यात त्वचा खराब होते ती अक्लोहोल, सोडियम, लाॅरेल सल्फेटसारखे याकाळात त्वचेस घातक ठरणारे घटक असलेले क्लीन्जर वापरुन. हिवाळ्यात कोरियन महिला त्वचा कोरडी पडू नये, खराब होवू नये यासाठी हिवाळ्याच्या दिवसात त्या मिसेलर वाॅटर वापरतात. मिसेलर वाॅटर यात सौम्य क्लीन्जर घटक असतात. यामुळे त्वचेचं नुकसान न होता त्वचा स्वच्छ होते.
कोणतंही क्लीन्जींग प्रोडक्ट , स्क्रबर न वापरता त्वचा स्वच्छ करण्याचा कोरियन महिलांचा सोपा उपाय म्हणजे त्या एक मऊ सूती रुमाल घेतात. तो रुमाल गरम पाण्यात बुडवून घट्ट् पिळून घेतात आणि त्या रुमालानं आपला चेहरा पुसता. यामुळे त्वचेवरील घाणं स्वच्छ होते, मृत त्वचा निघून जाते.
Image: Google
3. कोरियन महिलांचं चहावर खूप प्रेम. पण त्या केवळ चवीसाठी म्हणून चहा घेत नाही तर आपली त्वचा, फिगर आणि आपलं आरोग्य जपण्यासाठी चहा पितात. त्या पित असलेला चहादेखील खास आहे. त्या चहा म्हणून रोस्टेड बार्ली टी, ग्रीन टी पितात. कारण या प्रकारच्या चहात ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. निरोगी त्वचेसाठी ॲण्टिऑक्सिडण्टस खूप महत्त्वाचा घटक असतो. त्वचा कोरडी होवून मुरुम पुटकुळ्यांच्या समस्या निर्माण होतात. पण त्वचेला हवे असलेले ॲण्टिऑक्सिडण्टस मिळाले तर त्वचेला मुरुम पुटकुळ्यांचा धोका नसतो. हिवाळ्यात त्वचा जपण्यासाठी हॅल्युरिक ॲसिड हा घटक असलेला फेस शीट मास्क वापरावा. याद्वारे हिवाळ्यात त्वचेतली आर्द्रता टिकवता येते. ग्लिसरीन हा घटक असलेला फेस शीट मास्कमुळेही हिवाळ्यात त्वचा मऊ मुलायम राहाते.
Image: Google
4. कोरियन महिला वातावरणाप्रमाणे आपले ब्यूटी प्रोडक्टसही बदलतात. खास हिवाळ्यासाठीचे क्रीम, लोशन वापरतात. हॅल्युरिक ॲसिड, ई जीवनसत्त्व, फळं,फुलं, हिरव्या भाज्या यांचा नैसर्गिक अर्क असलेले क्रीम लोशन्स वापरुन कोरियन महिला हिवाळ्यात आपली त्वचा जपतात.
Image: Google
5. डागरहित त्वचा हे कोरियन महिलंच्या नैसर्गिक सौंदर्याचं वैशिष्ट्य. त्वचा खराब होत ती उन्हामुळे. हिवाळ्यात सूर्यप्रकाश जास्त नसला, प्रखर ऊन पडत नसलं तरी कोरियन महिला सनस्क्रीन लोशन आवर्जून वापरतात. सनस्क्रीन लोशन हे कोरियन महिलांच्या सौंदर्य प्रसाधनातील अत्यावश्यक बाब आहे.
Image: Google
6. हिवाळ्यात डोळ्याखालच्या त्वचेचं खूप नुकसान होतं. डोळ्याखालची त्वचा मुळातच नाजूक असते. ती कोरडी पडून तेथील त्वचेवर सुरकुत्या पडतात. या फाइन लाइन्स टाळण्यासाठी कोरियन महिला खास आय सीरम आणि आय क्रीम्स यांचा उपयोग करतात.