आलिया भट नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. काही दिवसांपुर्वीच आपल्या मैत्रिणीच्या लग्नातल्या संगीत समारंभात आलियाने स्वीटहार्ट कट नावाचे ब्लाऊज आणि लेहेंगा घातला होतो. या लेहेंग्याच्या ब्लाऊजच्या विचित्र पद्धतीमुळे आलिया या प्रकरणानंतर चांगलीच ट्रोल झाली होती. आता आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या जबरदस्त आयकॅची ठरलेल्या साडीमुळे ही साडी ब्राईट रेड रंगाची तर आहेच पण लेस पॅटर्नची आहे. या साडीची जी लेस आणि आलियाने साडीवर जे स्लिव्हलेस स्ट्रिप ब्लाऊज घातले आहे, ते देखील सिक्वीन प्रकारचे आहे. आजकाल सिक्वीन प्रकारच्या साडीचा चांगलाच ट्रेण्ड असून या साड्या पार्टीवेअर प्रकारात मोडल्या जातात. बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री रात्रीच्या पार्ट्यांना सिक्वीन साडी नेसणेच पसंत करतात.
सिक्वीन आर्टचा इतिहास
History of sequin art in Marathi
सिक्वीन ही कला काही आताची नाही. ही बरीच प्राचीन कला असून ती मध्यपुर्व आणि भुमध्य देशांची खासियत आहे. सिक्का हा अरेबियन शब्द आणि शिक्क्यांसाठी असणारा कॉईन हा इंग्रजी शब्द यावरून सिक्वन्स या शब्दाची निर्मिती झाली आहे, असा अंदाज व्यक्त केला जातो. सिक्वीन साडीमध्ये सिक्के म्हणजेच गोल गोल आकाराचे छोटे छोटे कॉईनसारखे असणारे शिक्के लावून साडी तयार केली जाते. शिफॉन किंवा रेशमी साड्यांवर हे शिक्के लावले जातात. हल्ली गोल आकारासोबत वेगवेगळ्या आकारांच्या शिक्क्यांचाही वापर केला जातो.
खूप पुर्वी बुट, चपला, बॅग यांना सुशोभित करण्यासाठी सिक्वीन आर्टचा उपयोग व्हायचा. कालांतराने त्याची लोकप्रियता वाढत गेली आणि कपड्यांसाठीही ही कला वापरली जाऊ लागली. सिक्वन्स आर्ट ही प्रामुख्याने हस्तकलेमध्ये मोडणारी होती. पण आता काळानुसार यामध्येही बदल होत असून मशिनद्वारे ही कलाकुसर करता येते. इ.स.पूर्व २५०० च्या सुमारास सिंधू व्हॅलीमध्ये सोन्याचे शिक्के वापरून अतिशय नजाकतीने कलाकुसर केली जायची, असेही सांगितले जाते.
हल्ली शिमर साड्यांवर सिक्वीन वर्क करण्यात येते. मनिष मल्होत्रा आणि सब्यासाची मुखर्जी यांनी शिमर साड्यांवर सिक्वीन वर्क करण्याचा ट्रेण्ड आणला आणि तो प्रचंड हिट ठरला. अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्रीदेखील उन्हाळ्यात समर ट्रेण्ड म्हणून सिक्वीन वर्कच्या साड्या नेसताना दिसल्या. सिक्वीन साडीची एक खासियत म्हणजे ही साडी भरजरी असली तरी अतिशय लाईटवेट असते. या साडीवर इतके वर्क केलेले असते की, त्यामुळे दागिने आणि मेकअप यांच्यावर एक्स्ट्रा काम करण्याची गरज पडत नाही. पार्टीवेअर असणारी ही साडी हमखास भाव खाऊन जाणारी ठरते आहे. ही साडी सर्वसामान्यांच्या आवाक्यातली असून अगदी २ हजारांपासून ते लाखभर किमतीपर्यंत सिक्वीन साडीचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.