Lokmat Sakhi >Beauty > रोज गळतात- केस पातळ झाले? सकाळी न चुकता १ लाडू खा; भराभर वाढतील-काळे राहतील केस

रोज गळतात- केस पातळ झाले? सकाळी न चुकता १ लाडू खा; भराभर वाढतील-काळे राहतील केस

Ladoo For Hair Growth and Black Hairs : हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते  ड्रायफ्रुट्स पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. यामुळे शरीर निरोगी राहते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 10:52 AM2023-10-23T10:52:22+5:302023-10-23T13:32:59+5:30

Ladoo For Hair Growth and Black Hairs : हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते  ड्रायफ्रुट्स पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. यामुळे शरीर निरोगी राहते.

Ladoo For Hair Growth and Black Hairs : Ayurvedic Doctor Share Ways to prepare ladoo and hair oil for hair growth | रोज गळतात- केस पातळ झाले? सकाळी न चुकता १ लाडू खा; भराभर वाढतील-काळे राहतील केस

रोज गळतात- केस पातळ झाले? सकाळी न चुकता १ लाडू खा; भराभर वाढतील-काळे राहतील केस

आपले केस लांबसडक आणि दाट असावेत असं प्रत्येक मुलीला वाटते. (How to grow hair) सुंदर केसांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो इतकंच नाही तर सौंदर्यातही भर पडते. पण धूळ, प्रदूषण, मातीच्या संपर्कात आल्यामुळे केसांची नैसर्गिक सुंदरता कमी होत जाते.(Hair Care Tips) याव्यतिरिक्त केसांची नैसर्गिक चमकही कमी होते. यामुळे केस रुक्ष आणि कोरडे होतात. (Ayurvedic Doctor Share Ways to prepare ladoo and hair oil for hair growth)

डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी इंस्टाग्रामवर केसांना पोषण देण्यबाबत अधिक माहिती दिली आहे.  (Ladoo For Hair Growth and Black Hairs) या उपायांमुळे यामुळे फक्त कोरड्या केसांना पोषण मिळत नाही तर केस मुळापासून मजबूत होतात आणि पांढऱ्या केसांच्या त्रासावरही आराम मिळतो. (Ayurvedic Doctor Share Ways to prepare ladoo and hair oil for hair growth)

ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने केसांवर कसा परिणाम होतो?

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते  ड्रायफ्रुट्स पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. यामुळे शरीर निरोगी राहते.  केसांना सुंदर आणि मजबूत ठेवण्यासाठी ड्रायफ्रुट्सच्या लाडूंचा आहारात समावेश करावा. रोज एक लाडू खाल्ला तरी शरीराला भरपूर पोषण मिळेल. यातून प्रोटीन्स, व्हिटामीन्स मिळतात ते केसांच्या वाढीसाठी आणि नॅच्युरल रंग टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

केस गळणं ताबडतोब थांबवायचंय? 8 कारणं समजून घ्या- खर्च न करता लांब, सुंदर केस मिळतील

ड्रायफ्रुट्सचे लाडू कसे बनवावे?

1) सगळ्यात आधी एका वाटीत खजूर आणि अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.  दुसऱ्या दिवशी भोपळ्याच्या बीया, नारळाचा किस, आळशीच्या बीया, बदाम, अक्रोड, काळे तीळ आणि काजू  समान प्रमाणात घेऊन मिक्सरमधून हलके वाटून घ्या. नंतर त्यात थोडं तूप घालून भाजून घ्या.

2) नंतर भिजवलेले खजूर आणि अंजिर मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि हे मिश्रण भाजलेल्या मिश्रणाबरोबर एकजीव करा. या मिश्रणाचे कमीत कमी  १० ते  १५ लाडू बनवू शकता. एक्सपर्ट्सच्या मते रोज सकाळी  एक  किंवा दोन लाडू नाश्त्याला दिवसभर उत्साही वाटेल. १० ते १५ मिनिटांनंतर दूधाचे सेवन करा. 

केसांना पोषण मिळण्यासाठी हर्बल ऑईल कसे बनवावे? (How to make hair oil for Hair Growth)

केसांना आतून पोषण मिळण्यासाठी व्यवस्थित तेल लावणं गरजेचं असतं.  केसांन पुरेपूर पोषण मिळाले तर केस शायनी दिसतात. म्हणून आठवड्यातून एकदा केसांना तेल लावायला विसरू नका. हर्बल तेल बनवण्यासाठी भृंगराज, मंजिष्ठा, आवळा, रोजमेरी, जास्वंद आणि टि ट्री घ्या. हे सर्व जिन्नस नारळाच्या तेलाबरोबर गरम करा. व्यवस्थित गरम झाल्यानंतर  एका बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवा. या तेलाच्या वापराने  २० ते ३० दिवसांत केसांच्या  लांबत फरक  दिसून येईल.

Web Title: Ladoo For Hair Growth and Black Hairs : Ayurvedic Doctor Share Ways to prepare ladoo and hair oil for hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.