सध्याच्या काळात पांढऱ्या केसांची समस्या सगळ्यांनाच सतावते. वाढत्या वयात केस पांढरे होणं सहाजिक आहे. परंतु ऐन तारुण्यात वय झालं नसताना देखील अकाली पांढरे केस होणे ही समस्या कित्येकांना लाजिरवाणी (Laughter Queen Bharti Singh Shared Her White Hair Remedy With Natural Ingredients) वाटते. सुरूवातीला एक ते दोन केस पांढरे होतात नंतर हळूहळू सगळे केसच (Home Remedy for Gray Hair) पांढरे होतात. एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे करण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. डाय लावल्यानंतर लगेच केस काळे होत असले तरी ते पुन्हा पांढरे (Homemade remedy for white hair) व्हायला वेळ लागत नाही. पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी आपण अनेक उपाय करुन पाहतो.
असाच काहीसा एक खास देसी हटके उपाय सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Laughter Queen Bharti Singh) हिने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. भारतीने अकाली पांढरे झालेले केस घरच्याघरीच नॅचरल पदार्थ (1 Best Home Remedy For Premature Greying Hairs ) वापरुन कसे काळे करता येतील याचे एक सिक्रेट सांगितले आहे. आपले पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी भारती कोणत्याही महागड्या सलॉन किंवा पार्लरमध्ये न जाता सरळ घरगुती पारंपरिक उपाय करण्यावर अधिक जास्त भर देते. जर तुमचेही केस अकाली पांढरे झाले असतील तर सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह हिने सांगितलेला हा खास देसी उपाय नक्की ट्राय करुन पाहा.
साहित्य :-
१. एलोवेरा जेल - १/२ कप
२. कॉफी पावडर - २ टेबलस्पून
३. चहा पावडरचे पाणी - गरजेनुसार
४. मेहेंदी - ४ ते ६ टेबलस्पून (केसांच्या लांबीनुसार)
कृती :-
१. सगळ्यात आधी एक लोखंडाची कढई घेऊन त्यात मेहेंदी पावडर, एलोवेरा जेल, कॉफी पावडर आणि चहा पावडरचे गाळून घेतलेले पाणी असे सगळे जिन्नस एकत्रित करून लोखंडाच्या कढईत भिजवून घ्यावेत.
२. सगळे जिन्नस लोखंडाच्या कढईत एकत्रित भिजवून रात्रभर ती कढई झाकून ठेवून द्यावी.
३. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण ही कढईवरचे झाकण उघडून बघाल तेव्हा मेहेंदी संपूर्णपणे रंग बदलून काळी झालेली असेल.
भारती सिंग लेकासाठी करते थंडीत खास पौष्टिक लाडू, पाहा तिनं सांगितलेली खास रेसिपी...
ही तयार पेस्ट केसांवर कशी लावावी ?
तयार पेस्ट केसांवर संपूर्णपणे ब्रशच्या मदतीने लावून घ्यावी. त्यानंतर केसांवर ही तयार पेस्ट तशीच तासभर राहू द्यावी. मग केस स्वच्छ धुवून घ्यावेत. केस धुतल्यानंतर आपले पांढरे केस संपूर्णपणे काळे झाले असतील. या नॅचरल पद्धतीने केस काळे केल्यास पुढचे किमान ६ ते ८ महिने तरी आपले पांढरे केस दिसून येणार नाहीत. सोबतच, हा नॅचरल हेअर मास्क मेहेंदी, केमिकल्सयुक्त हेअर डाय यांच्यापेक्षा बराच काळ केसांवर टिकून राहतो.