Join us  

रताळ्याला बटाट्याप्रमाणेच समजून खाणे टाळता ? रताळं खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2023 8:14 PM

5 Amazing Benefits Of Sweet Potatoes For Your Skin & Hair : नैसर्गिक केसांच्या वाढीपासून ते चमकदार त्वचेपर्यंत, रताळे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे....

आषाढी एकादशी आली की, बाजारांत रताळ्याचे ढीग  दिसायला लागतात. उपवासासाठीच रताळी खावी म्हणून रताळी घेतली जातात. परंतु रताळे हे दिसायला थोडेफार बटाट्या प्रमाणाचे असते. काहीजण तर बटाट्यासारखे दिसणारे कंदमुळे म्हणून वजन वाढायच्या विचाराने रताळं विकत घेण्याचा विचार टाळतो. परंतु ही आपली सर्वात मोठी चूक असते. कारण रताळे वजन वाढवत नाहीत तर वजन कमी करण्याच्या कामी येतात. त्याचबरोबर आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टीने देखील रताळं खाणं फायदेशीर ठरते. रताळं आपण रोज खात नसलो तरीही बाजारांत ती कायम उपलब्ध असतात. रताळ्याचा आपल्या रोजच्या आहारात समावेश केल्यास त्याचा फायदा आपल्याला होतो.  

अनेकांना रताळी भाजून किंवा उकडून खायला खूपच आवडतात. रताळ्यामध्ये लोह, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी, डी, सी, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, थायमिन, जस्त यांचे प्रमाण अधिक असते. रताळ्यामधील ही पोषक तत्व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असतात तसेच दिवसभराच्या शारीरिक गरजांसाठी पुरेसे असते. रताळ्याचे अनेक चमचमीत पदार्थ करून देखील खाता येतात. रताळं हे एक प्रकारचं अतिशय लोकप्रिय कंदमूळ आहे. हिरव्या भाज्या व कडधान्य खाणे हे जसे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असते तसेच कंदमुळं खाण हे देखील आरोग्याला उपयुक्त ठरते(LEARN ABOUT THE BENEFITS OF SWEET POTATO FOR SKIN AND HAIR).

सौंदर्य खुलवण्यासाठी रताळ्याचा कसा वापर करावा :- 

१. उन्हाळ्यांत होणाऱ्या सन डॅमेज पासून बचाव :- रताळे हे बीटा-कॅरोटीनच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहेत. बीटा-कॅरोटीन हे एक संयुग आहे जे पुढे सक्रिय व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जे त्वचेला सूर्याच्या नुकसानीपासून वाचवते.

तुम्ही हमखास ५ चुका करता, म्हणून तर तुमचे केस गळतात! महागडी प्रॉडक्ट्स वापरुन मग काय उपयोग...

२. ग्लोइंग स्किन :- बीटा-कॅरोटीन असलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने त्वचा आतून चमकते. याव्यतिरिक्त, रताळ्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सचे नुकसान कमी करण्यास देखील मदत करू शकतात, जे त्वचेसाठी दीर्घकाळ फायदेशीर ठरतात. 

पिंपल्स, फोडांचे डाग जाता जात नाहीत? हा घ्या ‘खास’ पाण्याचा सोपा फॉर्म्युला, चेहरा दिसेल नितळ...

३. चेहऱ्यावरील वृद्धत्वाच्या खुणा दूर करतात :- रताळ्यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असते. हे जीवनसत्व कोलेजनच्या संश्लेषणात महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे त्वचेची लवचिकता आणि इतर पैलू प्रभावित होतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि कोरडेपणा टाळण्यासाठी व्हिटॅमिन ए उपयुक्त ठरते.  त्यामुळे जर आपल्याला मुलायम आणि तरुण त्वचा हवी असेल तर रोजच्या आहारात त्याचा समावेश करणे आवश्यक आहे. 

४. चेहऱ्यावरील डाग - मुरुमांच्या खुणा दूर करते :- रताळ्यामध्ये अँथोसायनिन्स ही पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात, ज्यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग आणि मुरुमांच्या गडद खुणा टाळण्यास मदत होऊ शकते. 

५. केसांसाठी फायदेशीर ठरते :- रताळ्यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन हा घटक केस गळणे आणि केस पातळ होणे यांसारख्या समस्यांपासून केसांचे संरक्षण करते. जीवनसत्त्वे अ आणि क व्यतिरिक्त, या भाजीमध्ये जीवनसत्त्वे बी आणि ई तसेच पोटॅशियम, मॅंगनीज इत्यादी खनिजे देखील भरपूर असतात. हे सर्व पोषक आरोग्यासाठी तसेच केसांसाठी फायदेशीर असतात आणि केसांच्या निरोगी वाढीस मदत करू शकतात.

प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा सांगतात, खास घरगुती फेसपॅक - चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू...

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी