Join us  

हिवाळ्यात केसांना तेल लावल्याने खरंच सर्दी - खोकला होतो ? तज्ज्ञ सांगतात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2023 2:49 PM

Is coconut oil good for hair during winter ? : हिवाळ्यात केसांना तेल लावल्याने काहींना सर्दी - खोकला होतो, त्यामुळे केसांना तेल लावणे योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात..

सध्या वातावरणात हलकासा थंडावा जाणवू लागला आहे. थंडीच्या या दिवसांत आपल्याला एकूणच त्वचेची व केसांची भरपूर काळजी घ्यावी लागते. वातावरणातील वाढत्या गारठ्यानुसार याचे परिणाम आपल्या विशेषतः त्वचेवर व केसांवर दिसून येतात. वेळीच केसांची आणि त्वचेची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्यांचे नैसर्गिक सौंदर्य हरवू शकते. थंडीच्या दिवसांत केसांचा विचार केला असता केसांसंबंधित अनेक लहान - मोठ्या समस्या निर्माण होतात. प्रत्येक ऋतूनुसार केसांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घ्यावी लागते. केसांच्या या बारीक - सारीक समस्या सोडवण्यासाठी केसांना तेलाने मालिश करणे (Amazing Ways To Use Coconut Hair Oil On Your Hair This Winter) हा सर्वात सोपा आणि बेसिक पर्याय मानला जातो(Is coconut oil is bad or good to apply on hair during winters?).

आपल्याकडे केसांच्या उत्तम आरोग्यासाठी केसांना खोबरेल तेल लावण्याचा सोपा पर्याय निवडला जातो. पण, जसजसा हिवाळा वाढत जातो तसतसे काही लोक त्याचा वापर करणे बंद करतात. थंडीच्या दिवसात खोबरेल तेलाने डोक्याला मसाज केल्याने सर्दी - खोकला होतो असे काहींचे मत असते. असे असल्यामुळे बहुतेकजण थंडीच्या दिवसांत केसांना तेल लावणे टाळतात. परंतु नक्की यात काही तथ्य आहे का ?  RVMU अकादमीच्या संस्थापक, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि स्किन केअर तज्ज्ञ रिया वशिष्ठ यांच्याकडून हिवाळ्यात केसांना खोबरेल तेल लावावे की लावू नये हे जाणून घेऊयात(Learn How to Apply Coconut Oil on Hair in Winter).

हिवाळ्यात केसांना खोबरेल तेल लावावे की लावू नये ? 

खोबरेल तेल कोणत्याही ऋतूत केसांना लावता येऊ शकते. खोबरेल तेल केसांसाठी खूप चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे हिवाळ्यातही केसांसाठी उपयुक्त ठरतात. तज्ज्ञांच्या मते केसांना आठवड्यातून दोनवेळा तेल लावावे. यासाठी आपण खोबरेल तेल वापरू शकता. जर हिवाळ्यात खोबरेल तेल लावल्याने आपल्याला सर्दी होत असेल तर डोक्याला तेल लावण्यापूर्वी थोडेसे कोमट करावे. यानंतर केसांना या तेलाने हलक्या हाताने मसाज करावा. लक्षात ठेवा, डोक्याला जोराने मालिश केल्याने केस गळतात आणि केस कमकुवत होतात.

कितीही शाम्पू - कंडिशनर वापरले तरी केसगळती होतेच ? करा १ सोपी योगमुद्रा, केस गळणे बंद...

स्किन स्पेशालिस्ट सांगतात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत, केसगळती - पांढरे केस समस्याच संपतील...

हिवाळ्यांत केसांना खोबरेल तेल लावण्याची योग्य पद्धत :- 

१. तेलाने मालिश करा :- हिवाळ्यांत केसांना खोबरेल तेल लावण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आवश्यकतेनुसार तेल कोमट करुन केसांना मालिश करणे.   मसाज केल्यानंतर तेल डोक्यावर एक ते दोन तास राहू द्या. यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यावे. यामुळे टाळूची खाज, कोंडा इत्यादी अनेक समस्या दूर होतील. याशिवाय डोक्याला मसाज केल्याने रक्ताभिसरणही सुधारते.

२. हेअरमास्कमध्ये तेल मिसळा :- हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरमास्कचा वापर करु शकता. केसांना पोषण देण्यासाठी हेअर मास्कमध्ये खोबरेल तेलाचे काही थेंब मिसळून केसांवर लावू शकता. हेअर मास्क बनवण्यासाठी दही, लिंबाचा रस आणि कढीपत्त्याची पेस्ट मिक्स करा. तसेच त्यात खोबरेल तेलाचे काही थेंब घाला आणि हेअर मास्क तयार करा. 

३. कंडिशनरमध्ये तेल मिसळा :- हिवाळ्यात केसांना कंडिशनिंग करणे खूप महत्वाचे असते. केवळ शॅम्पूच्या मदतीने केस मॉइश्चराइज होत नाहीत. कंडिशनर लावल्याने केस सुंदर आणि चमकदार होतात. अशावेळी कंडिशनरमध्ये खोबरेल तेलाचे काही थेंब घालून ते केसांना लावा. यामुळे हिवाळ्यातही केस व्यवस्थित कंडिशनिंग केले जातील. 

केस खूपच गळत आहेत ? 'या' सोप्या पद्धतीने केस विंचारल्यास केस गळणे होईल बंद...

देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...

केसांना खोबरेल तेल लावण्याचे फायदे :- 

१. खोबरेल तेलाचा नियमित वापर केल्याने केसांचे पोषण होते आणि केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. यामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या दूर होते. 

२. खोबरेल तेलाचा नियमित वापर केल्याने केस मजबूत होतात आणि केस गळणेही कमी होते.

३. खोबरेल तेल एक प्रकारचे नैसर्गिक कंडिशनर आहे. आठवड्यातून दोन वेळा केसांना तेल लावल्याने केस मुलायम आणि चमकदार होतात.

४. खोबरेल तेलाच्या वापराने टाळूला खाज येणे, त्वचेचा संसर्ग आणि खाज येणे असे अनेक आजारही बरे होतात. नारळाच्या तेलामध्ये असलेले पोषक तत्व देखील केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करतात. 

केसांना तेल लावण्याचे दुष्परिणाम :- साधारणपणे केसांना खोबरेल तेल लावल्याने कोणतेही नुकसान होत नाही. असे असूनही खोबरेल तेल मर्यादित प्रमाणातच डोक्याला लावावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जास्त तेल लावल्याने किंवा तेलाने केसांना जास्त मसाज केल्याने केस तुटतात आणि केस जास्त तेलकट होऊ शकतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सथंडीत त्वचेची काळजी