Join us  

Beauty tips: लिंबू पिळून सालं फेकू नका.. रेशमासारखे केस आणि चमकदार त्वचेसाठी 'असा' करा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 2:57 PM

Beauty tips: लिंबू आपण नियमित खातो, पण त्याचं साल मात्र फेकून देतो..  असं करण खूप चुकीचं आहे.. वाचा लिंबाच्या सालीपासून (benefits of lemon for beauty) मिळणारे १० जबरदस्त फायदे !!

ठळक मुद्देसौंदर्याच्या दृष्टीने लिंबू साल किती महत्त्वाचं आहे, हे सांगितलं आहे औरंगाबादच्या सौंदर्यतज्ज्ञ विंदा ताकवाले यांनी ..

आरोग्यासाठी, सौंदर्यासाठी लिंबू किती उपयुक्त आहे, हे आपण जाणतोच.. त्यामुळे अनेक जण दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू टाकून पितात. लिंबाचं लोणचं, सरबत घेतलं जातंच पण सॅलड आणि भाज्या यांची चव अधिक खुलविण्यासाठीही लिंबू वापरलं जातं.. पण लिंबाचा उपयोग करताना बहुसंख्य जणांकडून होणारी एक समान चूक म्हणजे लिंबाचा रस पिळणे आणि त्याची सालं थेट कचऱ्यात टाकून देणे.. पण सौंदर्याच्या दृष्टीने लिंबू साल किती महत्त्वाचं आहे, हे सांगितलं आहे औरंगाबादच्या सौंदर्यतज्ज्ञ विंदा ताकवाले यांनी ..

 

लिंबाच्या सालांचा असा करा उपयोग (use of lemon for beauty)१. सध्या केस अकाली पांढरे (use of lemon peel for gray hair) होण्याची समस्या खूप वाढली आहे. केस काळेभोर रहावेत आणि चमकदार, रेशमी व्हावेत, यासाठी लिंबाची सालं वाळवा, त्याची पुड करा आणि त्याने केस धुवा.२. लिंबाच्या सालांची पावडर व चंदन पावडर यांचा वापर करून चेहरा धुतल्यास चेहरा तजेलदार, चमकदार (lemon for glowing skin) होतो.

३. दात पिवळट पडले असतील, तर त्यांना मोत्यासारखे पांढरेशुभ्र, चमकदार करण्यासाठीही लिंबाच्या सालीचा उपयोग करता येतो. लिंबाची सालं दातांवर घासा. दातांचा पिवळेपणा कमी होतो.४. लिंबाच्या सालांमध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका करण्यासाठी लिंबाची सालं उपयुक्त ठरतात. लिंबू फ्रिजमध्ये ठेवा आणि त्यानंतर ते सालासकट किसा. लिंबाच्या सालांचा किस सलाद किंवा भाज्यांमध्ये वापरू शकतां.

५. नखे सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठीही लिंबाच्या सालांचा उपयोग करता येतो. यासाठी काही मिनिटे नखे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर लिंबाची सालं नखांवर घासा. आठवड्यातून एक- दोनदा हा उपाय केल्यास नखे मजबूत होतात शिवाय अधिक गुलाबी, स्वच्छ आणि चमकदार दिसू लागतात. ६. हाताचे कोपरे किंवा पायाचे घोटे काळवंडले असतील तर लिंबाच्या सालांवर मीठ टाका आणि ते हाताच्या कोपऱ्यांवर, पायाच्या घोट्यावर घासा. काळेपणा निघून जातो आणि ते स्वच्छ होतात. 

७. चेहऱ्यावरील पिंपल्स, मुरूमे घालविण्यासाठीही लिंबाची सालं उपयुक्त ठरतात. यासाठी लिंबाची सालं वाटून घ्या. त्यात मुलतानी माती टाकून ते मिश्रण कालवून घ्या. हा लेप चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटांनी लेप वाळला की चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरचे पिंपल्स, मुरुमे कमी होतात आणि त्यांचे डागही निघून जातात. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी