Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावर पिंपल्सचे काळे डाग पडलेत? कडूनिंबाचा फेसपॅक लावा, डाग गायब-चेहरा होईल नितळ

चेहऱ्यावर पिंपल्सचे काळे डाग पडलेत? कडूनिंबाचा फेसपॅक लावा, डाग गायब-चेहरा होईल नितळ

Lemon Leaf Powder Facemask to Reduce Dark Spots from the Face पिंपल्सचे डाग जाता जात नाहीत, मात्र कडूनिंबाचा घरगुती फेसपॅक उत्तम उपचार ठरू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2023 04:09 PM2023-02-16T16:09:28+5:302023-02-16T16:10:28+5:30

Lemon Leaf Powder Facemask to Reduce Dark Spots from the Face पिंपल्सचे डाग जाता जात नाहीत, मात्र कडूनिंबाचा घरगुती फेसपॅक उत्तम उपचार ठरू शकतो.

Lemon Leaves Facemask to get rid of acne, pimples & Glowing Skin | चेहऱ्यावर पिंपल्सचे काळे डाग पडलेत? कडूनिंबाचा फेसपॅक लावा, डाग गायब-चेहरा होईल नितळ

चेहऱ्यावर पिंपल्सचे काळे डाग पडलेत? कडूनिंबाचा फेसपॅक लावा, डाग गायब-चेहरा होईल नितळ

चेहऱ्यावर पुरळ आणि मोड्या उठणे सामान्य बाब आहे. वयानुसार चेहऱ्यावर पुरळ उठते. पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. पुरळ चेहऱ्यावर उठले की ते आपले काळपट डाग सोडून जातात. या डागांना एक्नेस्कार किंवा पुरळाचे डाग असेही म्हणतात. ज्यामुळे त्वचा खरबरीत व कोरडी दिसू लागते. एकदा का स्किनवर पुरळाने राज्य करायला सुरुवात केलं की, मग सौंदर्याला नजर लागली म्हणून समजा. मेकअप करून हे डाग लपवता येतात. मात्र, वारंवार चेहऱ्यावर मेकअप लावू नये. त्यातील काही केमिकल रसायनांमुळे चेहऱ्यावर अधिक डाग पडतात.

या डागांपासून कायमची सुटका हवी असल्यास काही घरगुती उपाय आपल्या कामी येतील. यासाठी कडुनिंबाच्या पावडरपासून तयार फेसमास्कचा वापर करून पाहा. कडुनिंब चेहऱ्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात. आपल्याला नितळ आणि स्वच्छ त्वचा हवी असल्यास या फेस्मास्कचा वापर फायदेशीर ठरेल.

कडुनिंबाच्या पावडरपासून तयार करा फेसमास्क

कडूनिंबापासून तयार पावडर

टी ट्री ऑईल

गुलाब जल

असा बनवा फेसमास्क..

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये कडूनिंबाच्या पानांपासून तयार पावडर घ्या. त्यात गुलाब जल, टी ट्री ऑईलचे ३ ते ४ थेंब मिसळा. हे संपूर्ण साहित्य टाकल्यानंतर मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर ब्रशच्या मदतीने पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा. मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर साधारण १० मिनिटे ठेवा. १० मिनिटे झाल्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवून घ्या.

कडूनिंबाचे फायदे अनेक आहेत. या पानांमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे त्वचा नितळ होण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्याला नवी चमक मिळते. त्याच प्रमाणे तुमचे वय चेहऱ्यावर दिसून येत नाही. टी ट्री तेलाचा वापर केल्याने त्वचेची जळजळ आणि इतर समस्याही कमी होईल. गुलाब जलच्या वापरामुळे चेहरा अधिक कोमल होतो. रुक्ष आणि कोरडेपणा कमी होतो. त्यामुळे हा फेसमास्क आपल्या चेहऱ्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

Web Title: Lemon Leaves Facemask to get rid of acne, pimples & Glowing Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.