जोपर्यंत आपण सेल्फी घेत नाही, तोपर्यंत दिवाळीचं सेलिब्रेशन कसं पुर्ण होणार ? एवढी सगळी तयारी केली आहे, या तयारीसाठी जवळपास ८ ते १० दिवस कष्ट घेतले आहेत. मग जर आता या सगळ्या तयारीचे फोटो सोशल मिडियावर टाकले नाहीत, तर ते कसे बरं सगळ्यांना दिसणार... म्हणून यासाठी दिवाली स्पेशल फोटोंची सिरिज तो बनतीही है.... पणत्यांसोबत, आकाशदिव्यासोबत, रांगोळीसोबत किंवा अगदी कुटूंबासोबत, मेकअप करताना, मेकअप झाल्यावर, फराळ बनविताना आणि तो खाताना ..... असा प्रत्येक वेळी एखादा सेल्फी झालाच पाहिजे. आणि यावेळी नुसता सेल्फी काढू नका, तर लोकमत सखीने आयोजित केलेल्या खास दिवाळी सेल्फी स्पर्धेत सहभागी व्हा. पाठवा तुमचे फोटो, Lokmat Sakhi selfie Contest साठी. आणि जिंका बक्षिसं.
ही संधी आहे, ही दिवाळी यादगार करण्याची आणि आपला आनंद वाढवण्याची..
पण नुसतेच सेल्फी काढून कसं चालेल, ते सोशल मिडियावर शेअर करायचे म्हणल्यावर ते छानही यायला हवेत ना.... जोपर्यंत सेल्फी चांगला येत नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यातले हॅपनिंग इव्हेंट्स सोशल मिडियावर शेअर करता येत नाहीत. त्यामुळे मग फारच पंचाईत होऊन जाते. म्हणूनच तर माझा सेल्फी छान येतंच नाही.... सेल्फीसाठी कसं हसावं, कसं पहावं हे मला कळतंच नाही, अशी तुमची तक्रार असेल, तर या काही भन्नाट सेल्फी टिप्स फॉलो करा.. मग बघा दिवाळीतला तुमचा प्रत्येक सेल्फी कसा झकास आणि परफेक्ट दिसतो ते...
आणि त्या परफेक्शनला द्या एक छान भेट. सहभागी व्हा Lokmat Sakhi selfie Contest मध्ये. साजरा करा आपला आनंद साऱ्यांसोबत.
त्यासाठी contest.lokmat.com इथं आपले सेल्फी पाठवा.
आपला सेल्फीही एकदम भारी यावा आणि त्याला भरपूर लाईक्स मिळाव्यात असं वाटेत असेल तर या काही सेल्फी टिप्स ..
१. सेल्फी काढताना ओठ एकदम घट्ट मिटून हसू नका. हसताना दातांचा काही भाग दिसू द्या. त्यामुळे तुम्ही ओढून ताणून हसताय असं वाटत नाही आणि तुमचा एकदम नॅचरल लूक येतो. मात्र हसताना सगळीच बत्तिशी दिसायला नको, याचीही काळजी घ्या. आपण कसे हसलो की अधिक चांगले दिसतो, हे एकदा स्वत: आरशासमोर उभे राहून तपासून पहा. ज्या स्माईलमध्ये आपण बेस्ट दिसतो, ती स्माईल सेफी काढताना ठेवा.
२. सेल्फी काढताना मान छानपैकी मोल्ड करता आली पाहिजे. सरळ, ताठ मानेतला सेल्फी अजिबातच स्टायलिश वाटत नाही. सेल्फी काढताना मान थोडीशी एका बाजूने झुकलेली हवी. कारण मान जर थोडी वाकवली तर चेहरा अधिक सुबक दिसतो आणि चेहऱ्याचे फिचर्स उठून दिसतात.
३. सेल्फी क्लिक करताना उजेड तुमच्या चेहऱ्यावर आणि कॅमेऱ्याच्या मागून यायला हवा. कमी उजेडात काढलेला सेल्फी आकर्षक दिसत नाही. दिव्यांसोबत सेल्फी काढताना असं अनेकदा होतं की आपला चेहरा चांगला येतो, पण मागचे दिवे उठून दिसत नाही. अनेकदा तर ते दिवे आहेत, हे देखील सेल्फीमध्ये कळत नाही. त्यामुळे अशावेळी तुमचा फोटो एडीट करा. फोटो एडिटींगसाठी इन्स्टाग्राम, पिक्सलरओमॅटिक, स्नॅपसीड अशा ॲप्समध्ये तुम्हाला छान इफेक्टस मिळतील.
४. जेव्हा सेल्फी काढता तेव्हा हात शक्य तेवढा लांब आणि उंचावर न्या. मान किंचित वर करून तुम्हाला कॅमेऱ्यात पाहायचे आहे, हे लक्षात घ्या आणि त्यानुसार सेल्फी काढा.
५. आपला फोटो कोणत्या अँगलने जास्त चांगले येतात ते प्रत्येकाला माहित असतं. सेल्फी क्लिक करताना ते लक्षात ठेवा आणि चटकन स्वत:ला ॲडजस्ट करा. सेल्फी काढताना शक्यतो सरळ उभे राहू नये. थोडंसं तिरकस उभं रहावं.
आता आपल्या या साऱ्या टिप्स वापरा, मोबाइल हातात घ्या आणि घ्या एक मस्त सेल्फी आणि तो पाठवा Lokmat Sakhi selfie Contestसाठी.
क्लिक करा contest.lokmat.com