Lokmat Sakhi >Beauty > Lips care Tips : लिपस्टीक लावली तर मास्कवर पसरतेय? मास्क अन् ओठ खराब होऊ नये म्हणून 'या' खास टिप्स

Lips care Tips : लिपस्टीक लावली तर मास्कवर पसरतेय? मास्क अन् ओठ खराब होऊ नये म्हणून 'या' खास टिप्स

Lips care Tips : मास्कमुळे महिलांच्या स्किन केअर रूटीनमध्येही बदल झाला आहे. मास्कमुळे अनेकींच्या त्वचेवर दाणे येण्याची समस्या उद्भवली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 12:55 PM2021-08-31T12:55:22+5:302021-08-31T14:22:28+5:30

Lips care Tips : मास्कमुळे महिलांच्या स्किन केअर रूटीनमध्येही बदल झाला आहे. मास्कमुळे अनेकींच्या त्वचेवर दाणे येण्याची समस्या उद्भवली. 

Lips care Tips : 5 Tips to protect lipstick from smudging under the mask | Lips care Tips : लिपस्टीक लावली तर मास्कवर पसरतेय? मास्क अन् ओठ खराब होऊ नये म्हणून 'या' खास टिप्स

Lips care Tips : लिपस्टीक लावली तर मास्कवर पसरतेय? मास्क अन् ओठ खराब होऊ नये म्हणून 'या' खास टिप्स

Highlightsमास्कमुळे बायकांची खूप गैरसोय झालीये असं म्हणता येईल. कारण ऐरवी लिपस्टीक कोणत्या शेडची लावायची याचा विचार करत बराचवेळ घालवणाऱ्या स्त्रिया आता लिपस्टिककडे फारसं लक्ष देत नाहीत. मास्क काढताना, घातलाना मास्कवरचा रंग हनूवटीला लागण्याची शक्यता असते. म्हणून लिपस्टीक लावण्याआधी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. 

'लिपस्टिक लावू की नको? मास्कमुळे असंही अर्धा चेहरा झाकला जातोय.' तुमच्यापैकी अनेकजणी असा विचार करत  असतील. कोरोनामुळे आपल्या सगळ्यांचंच आयुष्य बदललं आहे.  मास्क आपल्या आयुष्याचा एक भाग बनलाय. रोज बाहेर जाताना आठवणीनं मास्क लावावाच लागतो. मास्कमुळे महिलांच्या स्किन केअर रूटीनमध्येही बदल झाला आहे. मास्कमुळे अनेकींच्या त्वचेवर दाणे येण्याची समस्या उद्भवली. 

मास्कमुळे बायकांची खूप गैरसोय झालीये असं म्हणता येईल. कारण ऐरवी लिपस्टीक कोणत्या शेडची लावायची याचा विचार करत बराचवेळ घालवणाऱ्या स्त्रिया आता लिपस्टिककडे फारसं लक्ष देत नाहीत. लिपस्टिक लावली तरी मास्कला लागून मास्क  खराब होतो.  मास्क काढताना, घातलाना मास्कवरचा रंग हनूवटीला लागण्याची शक्यता असते. म्हणून लिपस्टीक लावण्याआधी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. 

१) लिपस्टिक लावण्याआधी  लिपबाम लावून १० मिनिटं थांबा

आता तुम्ही विचार कराल १० मिनिटं का थांबायचं? लिपस्टिक लावण्याआधी लिपबाम लावल्यानंतर १० मिनिट वाट पाहा कारण ओठांवर पूर्ण लिपस्टिक सेट होण्यासाठी हे गरजेचं आहे.  लिपस्टिक लावण्याआधीचा हा परफेक्ट बेस आहे. जर तुम्ही लिपबाम लावला नाही तर ओठांना परफेक्ट बेस मिळणार नाही. त्यामुळे लिपस्टिक पसरेल.

२) लिपलायनर

बरेच लोक लिप लाइनरकडे दुर्लक्ष करतात. खरं तर, लिप लाइनर ओठांना पूर्ण रूप देतं. तसेच, ते लिपस्टिक सेट करण्यासाठी मदत करतं. जेव्हा लिप लाइनर ओठांच्या क्रॅक्समध्ये लावले जाते तेव्हा लिपस्टिक पसरण्यास कमी वाव असतो. म्हणूनच, जर तुम्हाला मास्क लावायचा असेल तर लिपस्टिकच्या आधी लिप लाइनरचा वापर नक्की वापरा.

३) मॅट लिपस्टिकमध्ये इन्वेस्ट करा

जर लिपस्टिक ग्लॉसी किंवा क्रीमी असेल तर पसरण्याची शक्यता जास्त असते. मॅट लिपस्टिक तुमच्या ओठांना चिकटून राहील आणि तुमच्या ओठांचे संरक्षणही करेल.  लिप बाम लावल्यानंतर तुमचे ओठ हायड्रेटेड राहतील आणि त्यानंतर चांगली स्मज प्रूफ लिपस्टिक लावल्यास योग्य ठरेल. मॅट लिपस्टिक दिवसभर टिकते त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. 

४) लूज पावडरचा वापर

जर तुमच्याकडे क्रीमी लिपस्टिक असेल, तर तुम्ही ते एक आयडिया वापरून तिला मॅट फिनिशिंग देऊ शकता. जेणेकरून ते पुसली जाणार नाही. लिपस्टीक लावून झाल्यावर हलक्या हातानं पावडर त्यावर टॅप करा. पाच ते दहा मिनिटं थांबा मग पुन्हा मास्क लावा. 

५) लिपबाम बेस तयार  करा

लिप बामसह लिप बेस तयार करणे ठीक आहे, पण जर तुम्हाला असे वाटत असेल की हा एकच मार्ग आहे तर ते चुकीचं आहे. बाजारात लिप प्राइमर देखील उपलब्ध आहे आणि आपण त्यावर फाउंडेशन देखील वापरू शकता. आपण साध्या एलोवेरा जेलचा वापर प्रायमर म्हणून करू शकता आणि त्यावर स्किन फाउंडेशन वापरू शकतात.

Web Title: Lips care Tips : 5 Tips to protect lipstick from smudging under the mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.