प्रत्येकाला असे वाटते की, आपला चेहरा तजेलदार आणि सुंदर दिसावा. आपल्या चेहऱ्याची सुंदरता स्माईल आणि ओठांवर असते. आपण आपल्या चेहऱ्याची योग्य काळजी घेतो. मात्र, ओठांना आपण दुर्लक्षित करतो. ओठांवर काही प्रोडक्ट्स लावल्यामुळे काळपटपणा वाढत जातो. ओठ काळे पडण्याची अनेक कारणे आहेत. जसे की अशक्तपणा, शरीरात रक्ताची कमतरता, एलर्जी, सौंदर्य प्रसाधनांचा अधिक वापर इत्यादी. हिवाळ्यात ओठ प्रचंड फुटतात. याने ओठांची स्कीन कोरडी पडते यासह काळपट पडते.
जसे आपण चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी पीलऑफ फेसपॅकचा वापर करतो त्याच प्रमाणे, ओठांवरील काळपटपणापासून सुटका मिळवण्यासाठी पीलऑफ मास्कचा वापर करा. आपण हा मास्क घरगुती पद्धतीने बनवू शकता. याने ओठांवरील काळपटपणा दूर होईल यासह त्वचा कोमल होईल.
पीलऑफ मास्कसाठी लागणारं साहित्य
पीलऑफ फेसमास्क
हळद
गुलाबजल
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये कोणताही पीलऑफ फेसमास्क घ्या. त्यात हळद आणि गुलाबजल मिक्स करा. हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर ओठांवर लावा.
मिश्रण १० मिनिटे ठेवा आणि सुकल्यानंतर काढून टाका. याने ओठ मऊ आणि कोमल होतील यासह काळपटपणा दूर होईल. उत्तम रिझल्टसाठी ही प्रक्रिया आठवड्यातून २ वेळा करा.