सध्या बहुतांश महिलांना बेसिक मेकअप करायला जमतो. खरंतर मेकअपचे काम हे चेहऱ्यावरील फिचर्सना भरून काढायचे आहे. त्याचवेळी तुमचे सौंदर्य हायलाइट करणे सुद्धा. काही महिलांचे डोळे खूप लहान असतात. तर, काहींचे ओठ. मेकअपद्वारे आपण हवा तसा लुक मिळवू शकतो. ओठ हे चेहऱ्याचे प्रॉमिनेंट फीचर असतात. आपण त्यांचा आकार बदलू शकत नाही. परंतु मेकअपसह आपण त्यांना इच्छित इल्यूजन नक्कीच देऊ शकतो. अनेक अभिनेत्री काॅस्मेटिक सर्जरी करून आपल्या ओठांना हवा तसा लुक देतात. मात्र, हे लुक काहींंना सुट होतो तर, काहींना नाही. आपले ओठ देखील लहान आणि पातळ असतील, तर तुम्ही घरच्याघरी त्यांना नवीन लुक देऊ शकता. त्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीची गरज नाही. मेकअपच्या काही ट्रिक्स अवलंबून आपण पातळ ओठांना सुंदर बनवू शकता.
स्क्रबिंगने सुरूवात करा
आपल्या ओठांना एक्सफोलिएट करून मेकअप सुरू करा. जर आपले ओठ कोरडे झाले असतील तर ते पातळ असल्याचा भ्रम निर्माण करतात. त्यासाठी सर्वप्रथम त्यांना चांगले एक्सफोलिएट करा. तुम्ही आपल्या ओल्या ओठांना टूथब्रशने स्वच्छ करू शकता. किंवा अगदी ओल्या टॉवेलने देखील स्क्रब करू शकता. किंवा क्रीममध्ये साखर घालून घरगुती स्क्रब बनवू शकता. आणि त्याचा वापर करू शकता.
लिप बाम लावा
लिप बाम आपल्या ओठांसाठी खुप फायदेशीर आहे. जेव्हा लिप मेकअप करत नसाल तेव्हा ओठांवर लिप बाम लावण्याची सवय लावा. लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बाम किंवा मॉइश्चरायझर लावा. लिप लाइनरने लिप मेकअप सुरू करा. ओठ थोडे जाड दिसण्यासाठी बाहेरच्या दिशेने आउटलाइन करा. नंतर, त्यावर हलकेच स्मज करा. आता खालच्या ओठांवर थोडा गडद रंग लावा. वरच्या ओठावर त्यापेक्षा थोडा हलका रंग. यानंतर लिप ब्रशने लिप कलर ब्लेंड करा.
लिपग्लॉस आवश्यक
ओठांच्या मध्यभागी म्हणजेच क्यूपिड बो वर थोडेसे हायलाइटर लावा, यामुळे ओठ थोडे जाड दिसतील. बोटाने हायलाइटर लावा आणि ब्लेंड करा, जेणेकरून ते वेगळे चमकणार नाही. शेवटी लिप ग्लॉस लावायला विसरू नका, त्यामुळे ओठ मोठे दिसतील.