Join us  

३ गोष्टी खाणं पिणं बंद करा, केस गळतीचा प्रश्न कायमचा सुटेल- केस होतील दाट काळेभोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 1:29 PM

List Of Foods That Cause Hair Loss केस इतके गळतात की टक्कल पडण्याची भीती वाटते, त्यावर उपाय म्हणजे ३ गोष्टी आहारातून तातडीने बाद करा.

सध्या अनेक लोकं केस गळतीपासून त्रस्त आहे. बिघडलेली जीवनशैली, योग्य आहाराचे सेवन न करणे, केसांची योग्य निगा न राहणे, ज्यामुळे केसांच्या निगडीत समस्या झपाट्याने वाढतात. केसात कोंडा, केस अकाली पांढरे होणे, केस गळणे या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

केस गळाल्यानंतर जर नवीन केस येत नसतील तर, टक्कल देखील पडू शकते. केस गळती सुरु झाल्यानंतर आपण अनेक प्रॉडक्ट्सचा वापर करून पाहतो. पण केसांची बाहेरून निगा राखण्यासोबत आहाराची देखील काळजी घ्यायला हवी. असे काही अनहेल्दी पदार्थ आहेत, ज्याच्या सेवनाने केसांची गळती होते. असे पदार्थ वेळीच आपल्या आहारातून वगळायला हवे. कोणते आहेत हे पदार्थ पाहूयात(List Of Foods That Cause Hair Loss).

केसांसाठी हानिकारक आहेत हे ३ पदार्थ

डाएट सोडा

डाएट सोडा पिण्याचा ट्रेंड तरुणांमध्ये वाढत चालला आहे. ज्यामुळे तरुण वयोगटातील लोकं केस गळणे, टक्कल पडणे याला बळी पडत आहेत. डाएट सोडामध्ये कृत्रिम स्वीटनर असते, जे स्काल्पसाठी हानिकारक मानले जाते. सोडा प्यायल्याने वजन वाढते, व याचा थेट परिणाम केसांवर देखील होतो. म्हणून डाएट सोड्याचे सेवन बंद करा.

२ रुपयांच्या लिंबाने करा घरगुती फेशियल, स्किन होईल क्लिअर, दिसाल फ्रेश - चेहरा करेल ग्लो

गोड पदार्थ

साखर सामान्यतः मधुमेहाचा शत्रू मानला जातो. कारण गोड पदार्थ रक्तातील साखरेची पातळी वाढवते. यासह केसांसाठी देखील हानिकारक मानली जाते. केस वाढीसाठी आहारात प्रोटीनचा समावेश असणं गरजेचं आहे. परंतु, साखरेमुळे प्रोटीन अब्जॉर्बशनमध्ये अडचणी येतात. त्यामुळे साखरेयुक्त पदार्थ खाणे टाळा.

१ चमचा कॉफी आणि अर्धा बटाटा, करून पाहा खास फेसपॅक - उन्हाने आलेले टॅनिंग - सुरकुत्या गायब

प्रिझर्वेटिव्ह फुड्स

केस जास्त प्रमाणात गळत असतील तर, प्रिझर्वेटिव्ह फुड्स खाणे टाळा. या पदार्थांमध्ये मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असते. यासह तळलेले पदार्थ खाणं कमी करा. शक्यतो ताजी फळे आणि भाज्या खा. यामुळे केस गळणे थांबेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी