Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावरचे पिंपल्सचे डाग कोणते पदार्थ वाढवतात? कोणते कमी करतात? घ्या लिस्ट

चेहऱ्यावरचे पिंपल्सचे डाग कोणते पदार्थ वाढवतात? कोणते कमी करतात? घ्या लिस्ट

Beauty Tips: आपल्या आहारावर आपल्या त्वचेचे आरोग्य बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. म्हणूनच तर चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि त्यांचे डाग (pimples and acne) वाढविणारे आणि कमी करणारे पदार्थ कोणते, याची माहिती आपल्याला पाहिजेच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 07:36 PM2022-06-03T19:36:29+5:302022-06-03T19:37:02+5:30

Beauty Tips: आपल्या आहारावर आपल्या त्वचेचे आरोग्य बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. म्हणूनच तर चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि त्यांचे डाग (pimples and acne) वाढविणारे आणि कमी करणारे पदार्थ कोणते, याची माहिती आपल्याला पाहिजेच..

List of the food items that are best and worst for the pimples and acne | चेहऱ्यावरचे पिंपल्सचे डाग कोणते पदार्थ वाढवतात? कोणते कमी करतात? घ्या लिस्ट

चेहऱ्यावरचे पिंपल्सचे डाग कोणते पदार्थ वाढवतात? कोणते कमी करतात? घ्या लिस्ट

Highlightsपिंपल्स आणि acne घालविण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याची ही माहिती.

चेहऱ्यांवर पिंपल्स येणं ही आधीच सौंदर्याच्या दृष्टीने वाईट समजली जाणारी गोष्ट. त्यामुळेच तर चेहऱ्यावरचे पिंपल्स पाहिले की सगळ्यात आधी कपाळावर आठ्या येतात. हा पिंपल ४ ते ५ दिवस राहतो आणि जातो. त्यानंतर मात्र पुढचा महिना- दिड महिना तरी त्याचे डाग आपल्या चेहऱ्यावर दबा धरून बसलेले असतात. असा acne असलेला चेहरा पुन्हा एकदा स्वच्छ, नितळ बनविण्यासाठी आपण आहारात काही पदार्थ आवर्जून घेतले पाहिजेत. (food that can reduce acne)

 

त्याविषयीची ही सविस्तर माहिती. पिंपल्स कमी करण्यासाठी आणि त्यांचे डाग घालविण्यासाठी बरेच जण वेगवेगळे कॉस्मेटिक्स वापरतात. शिवाय काही घरगुती उपायही (home remedies for reducing acne) करून बघतात. या सगळ्या गोष्टी निश्चितच सपोर्टीव्ह आहेत. पण त्या काही पिंपल्स आणि त्यांचे डाग या समस्येवरचा मुळ उपाय होऊ शकत नाहीत. म्हणूनच यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो आपला आहार. म्हणूनच तर पिंपल्स आणि acne घालविण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याची Dr Megha Sharma, Consultant Dermatologist यांनी शेअर केलेली ही माहिती.

 

acne वाढविणारे पदार्थ (bad food items for acne)
- दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, फास्टफूड, विकत मिळणारे फ्राईड पदार्थ, खूप चीज टाकलेले पदार्थ, बटाटे,  प्रोसेस्ड फूड, साखर असणारे पॅक ज्सूस, केक, डोनट, रोल्स, कुकीज, चॉकलेट, नारळाचं तेल, पाम तेल, पांढरा तांदूळ, ब्रेड, खारवलेले पदार्थ, ग्लायसेमिक इंडेक्स अधिक असणारे पदार्थ high glycemic index पदार्थ. हे पदार्थ चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि त्यांचे डाग वाढविणारे आहेत असं डॉ. मेघा यांचं मत आहे. 
- याविषयी सांगताना त्या असंही म्हणतात की प्रत्येकाची प्रकृती आणि एखाद्या पदार्थाला रिॲक्ट करण्याची प्रत्येकाच्या शरीराची पद्धती वेगवेगळी असते. त्यामुळे हे पदार्थ सगळ्यांसाठीच सारखेच लागू होतील असे नाही. पण तरीही एखाद्याला पिंपल्स आणि त्यांचे डाग अशी समस्या जाणवत असेल तर वरीलपैकी काही पदार्थ आपल्याला सूट होत नाहीत का, हे प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर तपासून पहावे.

 

पिंपल्स आणि त्यांचे डाग घालविण्यासाठी उपयुक्त पदार्थ
शुगर कंटेंट कमी असणारे पदार्थ, तसेच ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी आणि ई भरपूर असणारे पदार्थ, झिंकयुक्त पदार्थ, ओमेगा ३ फॅटी ॲसिड, ॲण्टीऑक्सिडंट्स हे पदार्थ आहारात असणे अतिशय गरजेचे आहे. कारण या पदार्थांमुळे मेटाबॉलिझम म्हणजे शरीरातील चयापचय क्रिया सुरळीत चालते आणि त्यामुळे आपोआपच पचनविकार दूर होतात. शरीरातून विषारीद्रव्ये बाहेर फेकली जातात आणि त्याचाच परिणाम त्वचेच्या आरोग्यावरही दिसून येतो. त्यामुळे कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, पिवळी आणि लाल फळं खाण्यावर विशेष भर द्यावा. 

 

Web Title: List of the food items that are best and worst for the pimples and acne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.