दयाळूपणाला आणि माणुसकीला पर्याय नाही... आणि ही वस्तुस्थिती आहे. सोशल मीडियावर माणुसकीचं दर्शन घडवणारे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर काळजाला भिडणारा लहान मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर एक हृदयस्पर्शी फोटो ट्विटरवर शेअर केला आणि खूप कमी वेळात हा फोटो तुफान व्हायरल झाला. (Little boy offers water to elderly couple on the street Viral picture)
Hatred is Taught. Kindness is Natural.❤️ pic.twitter.com/plKNo1asLv
— Awanish Sharan (@AwanishSharan) April 14, 2022
आता व्हायरल झालेल्या चित्रात, एक शाळकरी मुलगा रस्त्यावरील एका वृद्ध जोडप्याला स्वतःच्या बाटलीतून पाणी देताना दिसत आहे. हा साधा फोटो हजार शब्द व्यक्त करतो. हा फोटो तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल. द्वेष शिकवला जातो, दयाळूपणा नैसर्गिक आहे,” असं पोस्टच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
We're born with kindness.. We're born to love, with love
— ✨ (@houseofcrappp) April 14, 2022
हा फोटो शेअर केल्यानंतर, पोस्टला जवळपास 4k लाईक्स मिळाले. नेटिझन्सनी लहान मुलाच्या दयाळूपणाचे कौतुक केले आणि त्याच्या हावभावाचा स्पर्श मनाला भिडला. आपण दयाळूपणासाठी जन्मलो आहोत. आपला जन्म प्रेमासाठी झाला आहे,” असे एका वापरकर्त्याने लिहिले. दुसर्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, "निरागस मुलाचे अप्रतिम विचार आणि प्रशंसनीय हावभाव." या फोटोवर कौतुकास्पद कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.