आपले केस अजिबात गळू नयेत आणि छान लांबसडक असावेत अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. रस्त्याने जाताना कोणाचेही मोठे केस पाहिले की आपल्याला त्याचे अप्रूप वाटते आणि आपण बराच वेळ या केसांकडे पाहत राहतो. केस एकदा गळायला सुरुवात झाली की मग आपल्याला काही सुचत नाही. केसांतून नुसता हात किंवा कंगवा फिरवला तरी केसांचा पुंजकाच्या पुंजका बाहेर येतो. अशावेळी काय करावं ते आपल्याला सुचत नाही. मग वेगवेगळे घरगुती उपाय करुन किंवा पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट घेऊनही काहीच उपयोग होत नाही (Long Hair Secret Powerful hair oil for long and thick hair).
यामध्ये आपल्याला विनाकारण मानसिक त्रास होत राहतो आणि केस गळत असल्याने सौंदर्यात तर बाधा येतेच. अशावेळी घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन खास तेल तयार केले तर त्याचा निश्चितच फायदा होतो. हे तेल कसे तयार करायचे आणि केस गळणे कमी होण्यासाठी किंवा केसांची वाढ होण्यासाठी त्याचा कसा फायदा होतो पाहूया...
तेल कसे तयार करायचे?
१. एका कढईत १ लहान आकाराचा उभा चिरलेला कांदा, मेथ्या, कडीपत्ता, तीळ आणि कलौंजी घ्यायचे.
२. यामध्ये जास्वंदाची पानं घालून आपल्या आवडीप्रमाणे खोबरेल, ऑलिव्ह, तिळाचे किंवा मोहरीचे तेल घालायचे.
३. हे सगळे सोनेरी ब्राऊन रंगाचे होईपर्यंत साधारण ३ ते ४ मिनीटे चांगले उकळायचे.
४. गॅस बंद करुन हे तेल गाळून एका बरणीत भरून ठेवायचे आणि मग त्यामध्ये रोझमेरी इसेन्शिअल ऑईलचे १० ड्रॉप्स टाकायचे.
५. कापसाच्या बोळ्यावर हे तेल घेऊन ते केसांच्या मुळांना लावायचे.
६. तुमच्या केसांची मुळे खूप कोरडी असतील तर हे तेल रात्रभर लावून ठेवायचे आणि ऑयली असेल तर ४ ते ५ तासांसाठी हे तेल लावून ठेवायचे.
फायदे
१. केस वेगाने वाढण्यास मदत होते.
२. केस जाड होतात आणि छान फुललेले दिसतात.
३. केस गळतीचे प्रमाण कमी होते.
४. कोंडा आणि त्यामुळे येणारी खाज कमी होते.