तुमच्या केसांची वाढ खुंटली असेल आणि तुम्हाला केस वेगानं वाढवायचे असतील तर केसांसाठी बाजारातील केमिकल्सयुक्त उत्पादनं वापरण्याऐवजी मेथीची पेस्ट वापरा. (Hair Growth Tips) कारण मेथीची पेस्ट फक्त केसांना लांबसडक बनवणार नाही तर केसांना मजबूत बनवण्याचे काम करेल. ज्यामुळे केस, लांबसडक आणि दाट होण्यास मदत होईल. (Long Hairs Tips Fenugreek Paste Hair Growth)
सिमॅन्टीक स्कॉलरच्या संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार मेथीच्या बियांचा अर्क केसांची वाढ होण्यास परिणामकारक ठरतो. केस गळण्याची अनेक कारणं आहेत. मेथीच्या बियांमधील फायटोस्ट्रोजन केस वाढवण्याची प्रक्रिया जलद करते (Fenugreek For Hair Growth Benefits Usage Tips). मेथीचा अर्क असलेले हेअर टॉनिक केस गळणं थांबवण्यास मदत करते.
जर तुम्ही केसांना लांब करू इच्छित असाल तर तुम्ही केसांना नारळाच्या तेलाबरोबर मेथीची पेस्ट लावू शकता. नारळाच्या तेलामध्ये अनेक पौषक तत्व असतात ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस वेगानं वाढण्यास मदत होते. तुमच्याही केसांची वाढ थांबली असेल आणि तुम्हाला केसांची वाढ वेगानं करायची असेल तर तुम्ही मेथीची पेस्ट नारळाच्या तेलाबरोबर मिसळून केसांना लावू शकता. मेथीची पेस्ट बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती समजून घेऊ.
मेथीचे दाणे केसांवर कसे लावावेत?
सगळ्यात आधी मेथीचे दाणे साफ करून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. नंतर मेथीचे पाणी वेगळे करून मेथीचे दाणे व्यवस्थित वाटून घ्या. मेथीची पेस्ट तयार केल्यानंतर त्यात ५ ते ६ चमचे नारळाचं तेल घालून व्यवस्थित मिसळा. त्यानंतर हे मिश्रण थोडं गरम करून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यानंतर ही पेस्ट १ तासांसाठी केसांना लावून ठेवा नंतर केसांना लावून केस धुवून घ्या.
पोटाचे टायर्स सुटलेत-कंबर लठ्ठ दिसते? २१ दिवस हे पदार्थ खा, वितळेल चरबी-फिट दिसाल
या मिश्रणात व्हिटामीन ई कॅप्सूलचा रस घालू शकता. कारण व्हिटामीन ई कॅप्सूलमध्ये असे काही पोषक तत्व असतात ज्यामुळे केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. मेथीची पेस्ट नारळाच्या तेलासोबत लावल्यानंतर १ महिन्यात चांगला रिजल्ट दिसून येईल.