Join us  

वयापेक्षा १० वर्ष लहान दिसाल, रोज ५ योगासनं करा; कायम तरुण-निरोगी राहण्याचं सोपं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 4:11 PM

Look 10 Years Younger With These Yoga Asanas :  योगा शरीराला जीवघेण्या टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतो. यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि इम्यूनिटी वाढण्यास मदत होते.

वाढत्या वयात शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरही परिणाम होतो. यामुळे त्वचेचा ग्लो, लवचीकता कमी होते. हायपरटेंशन, डायबिटीस आणि हृदयाशी संबंधिक आजार  उद्भवतात. या समस्या दूर करण्यासाठी आणि शरीराला कायम तरूण ठेवण्यासाठी काही टिप्स फायदेशीर ठरू शकतात. कायम तरूण, यंग दिसण्यासाठी योगासनं फायदेशीर ठरतात. फिटनेस ट्रेनर निमिष यादव यांच्यामते योगाभ्यास केल्यानं शरीरासह मेंदूही निरोगी राहतो. (Yoga asanas to become 10 years  younger according to fitness expert)

 योगा शरीराला जीवघेण्या टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतो. यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि इम्यूनिटी वाढण्यास मदत होते. शरीर आणि त्वचेचे त्रास दूर होण्यास  मदत होते. ही योगासनं करण्यासाठी तुम्हाला जीमला जाण्याची काही गरज नाही. घरच्याघरी ५ ते १० मिनिटं वेळ काढून तुम्ही  वजन नियंत्रणात ठेवू शकता. (Look 10 Years Younger With These Yoga Asanas)

भुजंगासन

या योगाभ्यासात सगळ्यात आधी भुजंगासन करा. ही योगा पोझ छाती, खांदे आणि पोटाच्या मसल्समध्ये ताण तणाव निर्माण करते यामुळे नसांच्या समस्या टाळता येतात आणि मूड चांगला राहतो.

बालासन

दुसरं आसन आहे बालासन. हे डोकं आणि शरीरासाठी उत्तम असतं. हे योगासन केल्यानं छाती आणि इतर मसल्स रिलॅक्स राहण्यास मदत होते. चांगली झोप येते आणि  खांदे-हातांवर जास्त ताणतणाव येत नाही.

हलासन 

हलासन केल्याने पाठीचा कणा आणि पाठीचे स्नायू ताणले जातात. हे तुमच्या मान, खांद्यावर आणि पाठीवरील सर्व कडकपणा काढून टाकते. यासोबतच हे स्नायूही मजबूत होतात. त्यामुळे सांध्यातील वेदना आणि जडपणाही दूर होतो.

पवनमुक्तासन

हे योगासन पोटाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटावर साठलेली चरबीही कमी होते. बद्धकोष्ठता, पोट फुगणे, गॅस यांसारख्या समस्यांवर हा रामबाण उपाय ठरू शकतो.

चक्रासन

हे एक अद्भुत योगासन आहे, जे हृदयासाठी फायदेशीर आहे. या योगासनामुळे हृदयाचे स्नायू बळकट होऊन हृदयविकार दूर होण्यास मदत होते. हे आसन केल्याने कंबर, नितंब आणि खांद्याचे स्नायूही मजबूत होतात आणि लवचिकता वाढते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्सत्वचेची काळजी