उन्हाळ्यात त्वचेच्या आणि केसाच्या अनेक समस्या निर्माण होतात. टॅनिंग, घाम येणे, चिकटपणा, मुरुम, पुरळ यामुळे अक्षरशः कंटाळा येतो. उन्हाळ्यात त्वचा आणि शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक असते. यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते. त्यासोबतच तुमच्या आहारात बदल करणेही गरजेचे असते.
सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यावर फिरायला जायचे बेत आखले जात आहेत. उन्हाळ्यात समुद्रकिनारी जायचे ठरल्यास त्वचेची काळजी कशी घ्यायची हा प्रश्नच पडतो. तसेच समुद्रकिनारी फेरफटका मारत असताना आपण सुंदर देखील दिसले पाहिजे याची प्रत्येक महिला काळजी घेत असते. उन्हाळ्यात तुम्ही कोणकोणत्या गोष्टी वापरून तुमच्या त्वचेची देखभाल करू शकता आणि कोणत्या प्रॉडक्टमुळे तुमच्या सौंदर्यात भर घालू शकता याविषयी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
सनस्क्रीन किंवा सनस्टीक्स
उन्हापासून त्वचेचे संरक्षण करणे अतिशय महत्वाचे आहे. उन्हाळ्यात तुम्ही सतत घराच्या बाहेर पडत असाल तर तुमची त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. त्यासाठी उन्हाळ्यात कुठेही बाहेर पडणार असाल तर छत्री, स्कार्फ किंवा कॅपचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचेचा क्षोभ (सनबर्न) होतो. तसेच रखरखीत उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचेला डाग पडणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे उन्हाळ्यात बाहेर पडताना सनस्क्रीन अथवा सनस्टीक्स वापरणे अतिशय गरजेचे आहे.
सूर्यप्रकाशात त्वचेची काळजी न घेतल्यास सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे (UV rays) त्वचेचे अतोनात नुकसान करू शकतात. कोणत्याही संरक्षणाशिवाय उन्हात फिरल्यास टॅनिंग, सनबर्नची समस्या निर्माण होऊ शकते. बर्याचदा काही लोक त्यांच्या त्वचेवर सनस्क्रीन लोशन लावणे टाळतात आणि त्यामुळे त्यांना त्वचेला हानी पोहोचते. काही लोकांना सनस्क्रीन किंवा सनस्टीक्सचे फायदे किंवा कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन खरेदी करावे हेच माहीत नसते. तुम्ही ॲमेझॉन या ऑनलाईन वेबसाईटवर सनस्क्रीन किंवा सनस्टीक्ससाठी सर्च केले तर तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. न्यूट्रोजेना अल्ट्रा शीर सनस्क्रीनला (Neutrogena Ultra sheer Sunscreen) गेल्या काही काळापासून लोकांची चांगली पसंती मिळत आहे.
बॉडी वॉश आणि बॉडी लोशन
उन्हाळ्यामध्ये त्वचेवर ऊन, धूळ आणि प्रदूषणाचा परिणाम लगेचच दिसून येतो. तसेच घामाच्या ओलसरपणामुळे शरीर चिकचिक होते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे बॉडी वॉश वापरल्यास अधिक फ्रेश वाटते. तसेच घामाचा दुर्गंध कमी करण्यासाठी हे बॉडीवॉश मदत करतात. बॉडी वॉश तुमच्या शरीराला स्वच्छ करून तुमची त्वचा अधिक स्मुथ आणि सॉफ्ट बनवतं. बॉडी वॉश हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य असतात त्यामुळे दुर्गंधापासून सुटका करण्यासाठी आणि ताजेतवाने दिसण्यासाठी तुम्ही बॉडीवॉशचा पर्याय निवडू शकता. अनेक प्रकारचे बॉडी वॉश ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत.
हिवाळ्याप्रमाणे उन्हाळ्यात देखील आपल्या त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तिला मॉइश्चायइज करणे गरजेचे असते. उन्हाळ्यात बॉडी लोशनची निवड करताना जे लोशन हानिकारक युवी रेजपासून त्वचेचे रक्षण करेल, त्या लोशनची निवड करा. अशाप्रकारचे बॉडी लोशन त्वचेला हायड्रेट करून तिला थंडावा देखील मिळवून देतात. तसेच बॉडी वॉश आणि बॉडी लोशनची निवड करताना त्यात लॅक्टिक ॲसिड आणि ग्लायकोलिक हे घटक आहेत का हे आवश्यक तपासून घ्या. न्यूट्रीडर्म मॉश्चरायझिंग लोशन (neutriderm moisturising lotion) सारखे बॉडी लोशन तुम्ही ॲमेझॉनच्या साईटवरून खरेदी करू शकता. तसेच अनेकवेळा उन्हाळ्यात त्वचा निस्तेज होते. त्यामुळे त्वचेला पुन्हा ग्लो मिळण्यासाठी तुम्ही गार्निअर स्कीन नॅचरल्स फेस सिरम (Garnier Skin Naturals, Face Serum), लॉरियल पॅरिस रिव्हायटलिफ्ट क्रिश्टल फ्रेश हायड्रेटिंग जेल क्रिम (L'Oreal Paris Revitalift Crystal Fresh Hydrating Gel Cream) यांसारखी ॲमेझॉनवर मिळणारी उत्पादनं वापरू शकता.
समुद्रकिनारी जाताना अशाप्रकारे करा मेकअप
सुट्टीत समुद्र किनारी फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की, तिथे जाताना नेहमीपेक्षा वेगळा मेकअप करणे गरजेचे असते. समुद्रात भिजल्यानंतर समुद्राच्या पाण्याने तुमचा मेकअप खराब होऊ शकतो. त्यामुळे समुद्र किनारी फिरण्याचा बेत आखत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा ॲमेझॉनच्या वेबसाईटला जाऊन मेब्लिन न्यू यॉर्क आयलायनर (Maybelline New York Eyeliner), मेब्लिन न्यू यॉर्क लिक्विड लिप्सिक सेट (Maybelline New York Liquid Lipstick Set), मेब्लिन न्यू यॉर्क लिक्विड फाऊंडेशन (Maybelline New York Liquid Foundation) यांसारखी विविध उत्पादनं खरेदी करा. समुद्रकिनारी कधीही वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधनं वापरा तसेच आयशॅडो विकत घेताना ब्राईट रंगाला प्राधान्य द्या. गालावर ब्लश लावताना पीच अथवा कोरल रंगाचा वापर करा. तसेच उन्हाळ्यात समुद्रकिनारी फिरताना घाम येऊन शरीराला दुर्गंधी येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही फ्रेश राहाण्यासाठी आणि दुर्गंधी टाळण्यासाठी कोरा ऑरगॅनिक्स बॅलॅन्सिंग रोज मिस्ट (KORA Organics Balancing Rose Mist) या परफ्युमची तुम्ही निवड करू शकता.
समर ब्रंचला दिसा स्टायलिश
उन्हाळ्यात ब्रंचचे बेत अनेकवेळा आखले जातात. ब्रंच म्हणजे दुपारच्या वेळात एकत्र येऊन केली जाणारी छोटीशी पार्टी. या पार्टीला स्टायलिश दिसण्यासाठी ब्राईट आयशॅडो, ब्राईट ब्लशचा तुम्ही वापर करू शकता. मेब्लिन न्यू यॉर्क लिक्विड फाऊंडेशन (Maybelline New York Liquid Foundation), ,स्वीस ब्यूटी अलटिमेट ९ पिग्मेंटेड कलर्स आयशॅडो पॅलेट (Swiss Beauty Ultimate 9 Pigmented Colors Eyeshadow Palette) या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून तुम्ही तुमच्या सौंदर्यात आणखी भर खालू शकता. दिवसभर फिरायला जायचे असल्यास अथवा ऑफिसच्या कामाने तुम्ही दिवसभर बाहेर असल्यास देखील मेब्लिन न्यू यॉर्क लिक्विड फाऊंडेशनचा ((Maybelline New York Liquid Foundation) वापर करून पाहा. यामुळे तुम्ही एकदम थोडासा मेकअप करून देखील खूपच छान दिसाल.
लिपस्टिकच्या मदतीने वाढवा तुमचे सौंदर्य
लिपस्टिकमुळे तुमच्या सौंदर्यामध्ये नक्कीच भर पडते. तुम्ही ॲमेझॉनवरील जस्ट हर्ब्स आयुर्वेदिक लिपस्टिक मायक्रो-मिनी ट्रायल किट (Just Herbs Ayurvedic Lipstick Micro-Mini Trial Kit), रिनी फॅब ५-५ इन वन लिपस्टिक, मेब्लिन न्यू यॉर्क लिक्विड लिप्सिक सेट (Maybelline New York Liquid Lipstick Set) याची निवड करू शकता.
उन्हाळ्यात अशाप्रकारे घ्या केसांची काळजी
उन्हात जाताना शक्यतो केसाला स्कार्फ बांधा अथवा कॅप घाला. यामुळे केसांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवता येते. उन्हाळ्यात प्रचंड घाम येत असल्याने अनेकजण दररोज केस धुतात. पण तुमचे केस कोरडे होऊ नयेत म्हणून ते कमी वेळा धुवा. वारंवार धुण्यामुळे तुमच्या केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते आणि ते कोरडे होऊ शकतात. उन्हाळ्यात दररोज नव्हे तर 2-3 दिवसांनी आपले केस धुण्याचा प्रयत्न करा किंवा वॉश दरम्यान केस रिफ्रेश करण्यासाठी ड्राय शॅम्पू वापरा. तसेच केस धुण्याआधी तेलाने केसाला मालिश करून घ्या. ॲमेझॉनवर तुम्हाला लोरिअल प्रोफेशनल ॲब्सुलट रिपेअर शॅम्पू (L'Oréal Professionnel Absolut Repair Shampoo), लोरिअल प्रोफेशनल सेरी एक्सपर्ट डेन्सिटी ॲडव्हान्स शॅम्पू (L'Oréal Professionnel Serie Expert Density Advanced Shampoo), मॅट्रिक्स ऑप्टी. केअर प्रोफेशन शॅम्पू फॉर अँटी फ्रीज (MATRIX Opti.Care Professional Shampoo for ANTI-FRIZZ), ममाअर्थ ऑनियन हेअर ऑईल फॉर हेअर ग्रोथ अँड हेअर फॉल कंट्रोल (Mamaearth Onion Hair Oil for Hair Growth & Hair Fall Control), ममाअर्थ ऑनियन हेअर फॉल शॅम्पू (Mamaearth Onion Hair Fall Shampoo), वॉव स्कीन सायन्स ऑनियन शॅम्पू (WOW Skin Science Onion Shampoo), वॉव स्कीन सायन्स ऑनियन हेअर ऑईल (WOW Skin Science Onion Hair Oil), ॲनोमली क्लॅरिफायिंग शॅम्पू (Anomaly Clarifying Shampoo) असे केसांच्या मजबूतीसाठी आणि वाढीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
Amazon च्या वेबसाइटवर जाऊन शॉपिंग करण्यासाठी क्लिक करा >> https://www.amazon.in/