Join us  

थंडीमुळे त्वचा खूप कोरडी पडल्याने खाज येतेय? ३ उपाय, त्वचा होईल मऊ- मुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2022 6:28 PM

Skin Nourishing Tips For Winter: हिवाळ्याच्या दिवसांत हा त्रास अनेक जणांना जाणवतो. म्हणूनच त्यासाठी हे काही उपाय करून बघा.

ठळक मुद्देअंग खाजवलं की ते आणखीनच ड्राय होतं. म्हणूनच हा त्रास कमी करण्यासाठी काही पुढील काही सोपे उपाय करून बघा.

हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात- पावसाळ्यात जेवढं आपण त्वचेकडे लक्ष देत नाही, तेवढं हिवाळ्यात त्वचेला जपावं लागतं (skin care tips for winter). कारण हिवाळ्यातल्या थंड- कोरड्या हवेमुळे अंग लगेचच उलायला लागतं. म्हणजेच त्वचेतलं नैसर्गिक मॉईश्चर कमी होतं आणि मग अंग कोरडं पडायला सुरुवात होते. अशा कोरड्या अंगावर काही जणांना खूपच खाज येते (How to reduce body etching due to dryness in winter). खासकरून पाठ, पाय या भागांत खूपच जास्त खाज येते. अंग खाजवलं की ते आणखीनच ड्राय होतं. म्हणूनच हा त्रास कमी करण्यासाठी काही पुढील काही सोपे उपाय करून बघा (Skin Nourishing Tips For Winter). 

 

हिवाळ्यात अंगाला खूपच खाज येत असेल तर...१. खोबरेल तेलाने मसाजखोबरेल तेले हे त्वचेसाठी एक उत्तम मॉईश्चरायझर आहे. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत आठवड्यातून एकदा खोबरेल तेलाने संपूर्ण अंगाला मसाज करा. मसाज करण्यासाठी तेल कोमट करून घ्या. मसाज झाल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊण तासाने आंघोळ करा. म्हणजे तेल अंगात मुरेल. तसेच दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर पाठीला, पोटाला खोबरेल तेल लावून घ्या. यामुळे दिवसभर अंग मऊ राहण्यास मदत होईल. तसेच दररोज रात्री झोपण्यापुर्वीही सगळ्या अंगाला खोबरेल तेल किंवा इतर मॉईश्चरायझर लावण्यास विसरू नका. 

 

२. दुधाचा वापरदुधामध्ये त्वचेला मॉईश्चराईज करणारे अनेक घटक असतात. त्यामुळे दूध हे देखील एक नॅचरल मॉईश्चरायझर म्हणून ओळखलं जातं. आंघोळीपुर्वी संपूर्ण अंगाला दुधाने ८ ते १० मिनिटे मसाज करा. त्यानंतर आंघोळ करा. आंघोळीसाठी साबण वापरणं टाळा. त्याऐवजी बेसनपीठ आणि दही असं मिश्रण वापरा. यामुळेही अंग मऊ होऊन खाज कमी होण्यास मदत होते.

 

३. कडक पाण्याने आंघोळ टाळाहिवाळ्यात थंडी घालविण्यासाठी अनेक जण आंघोळीसाठी खूप कडक पाणी घेतात. खूप कडक पाणी घेतल्याने त्वचेचं डिहायड्रेशन होतं आणि तिच्यातलं नैसर्गिक मॉईश्चर आणखीनच कमी होतं. त्यामुळे कोमट पाण्यानेच आंघोळ करा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी