Lokmat Sakhi >Beauty > हिवाळ्यात केस गळणं खूपच वाढलं? १ घरगुती हेअरपॅक, आठवड्यातून फक्त एकदा लावा- केस होतील मजबूत

हिवाळ्यात केस गळणं खूपच वाढलं? १ घरगुती हेअरपॅक, आठवड्यातून फक्त एकदा लावा- केस होतील मजबूत

Hair Pack For Long And Strong Hair: हिवाळ्यात केस जरा जास्तच गळतात, अशी तक्रार अनेक जणांची असते. तुमचाही हाच अनुभव असेल तर हा घरगुती हेअरपॅक लावून बघा.(hair fall or hair loss due to winter)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 04:54 PM2023-01-13T16:54:11+5:302023-01-13T16:59:34+5:30

Hair Pack For Long And Strong Hair: हिवाळ्यात केस जरा जास्तच गळतात, अशी तक्रार अनेक जणांची असते. तुमचाही हाच अनुभव असेल तर हा घरगुती हेअरपॅक लावून बघा.(hair fall or hair loss due to winter)

Lots of hair fall or hair loss due to winter? Use this home made hair pack once in a week for long and strong hair | हिवाळ्यात केस गळणं खूपच वाढलं? १ घरगुती हेअरपॅक, आठवड्यातून फक्त एकदा लावा- केस होतील मजबूत

हिवाळ्यात केस गळणं खूपच वाढलं? १ घरगुती हेअरपॅक, आठवड्यातून फक्त एकदा लावा- केस होतील मजबूत

Highlightsघरात सहज उपलब्ध असणारं साहित्य वापरून तुम्ही हा हेअरपॅक तयार करू शकता.आठवड्यातून एकदा हा उपाय नियमित करून बघावा. केस गळणं कमी होईल. 

हिवाळ्यात जसं सगळं अंग कोरडं पडतं, तसंच डोक्याची त्वचाही कोरडी होऊ लागते. स्काल्पमधलं नॅचरल मॉईश्चर कमी झाल्याने मग केसांत कोंडा (dandruff) वाढतो आणि त्यामुळे मग केसांची मुळं कमकुवत होतात. यामुळे मग हिवाळ्यात केस गळण्याचं प्रमाण वाढतं (hair fall or hair loss due to winter). या कारणामुळे केसांचं गळणं वाढलेलं असेल तर हा एक घरगुती उपाय (home remedies) तुम्ही नक्कीच करून बघू शकता. घरात सहज उपलब्ध असणारं साहित्य वापरून तुम्ही हा हेअरपॅक (home made hair pack) तयार करू शकता. हा उपाय इन्स्टाग्रामच्या monika_kudrat या पेजवर शेअर करण्यात आला आहे. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा, असं व्हिडिओमध्ये सुचवलं आहे.  

केसांचं गळणं कमी करण्यासाठी उपाय
साहित्य

१. २५० मिली पाणी

२. २ चमचे तांदूळ

तिळाच्या लाडूला द्या चवदार ट्विस्ट- तिळाचे व्हाईट चॉकलेट ट्रफल्स, बघा शिल्पा शेट्टीची खास हेल्दी रेसिपी

३. १ चमचा चहा पावडर

४. २ चमचे मेथी दाणा

 

कृती
१. एका भांड्यात पाणी तापवायला ठेवा. त्यात मेथी दाणे, तांदूळ आणि चहा पावडर टाका.

२. हे मिश्रण ३० ते ४० सेकंद उकळून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा. आणि भांड्यावर झाकण ठेवून द्या.

कपड्यांपासून फर्निचरपर्यंत... सगळं घर होईल चकाचक, बघा घराच्या स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ६ भन्नाट उपयोग

३. मिश्रण कोमट झालं की ते मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यात मध्यम आकाराचा अर्धा कांदा, ३ ते ४ चमचे दही किंवा कच्चं दूध टाका आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. 

 

४. हा हेअरपॅक केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर लावा. २ तासांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून घ्या.

संक्रांतीला तीळ- गुळाचा कोणता मेन्यू करणार? लाडू- वड्या की पोळ्या? ७ चवदार पदार्थ बघून ठरवा तुमचा मेन्यू

५. आठवड्यातून एकदा हा उपाय नियमित करून बघावा. केस गळणं कमी होईल. 

 

Web Title: Lots of hair fall or hair loss due to winter? Use this home made hair pack once in a week for long and strong hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.