हिवाळ्यात जसं सगळं अंग कोरडं पडतं, तसंच डोक्याची त्वचाही कोरडी होऊ लागते. स्काल्पमधलं नॅचरल मॉईश्चर कमी झाल्याने मग केसांत कोंडा (dandruff) वाढतो आणि त्यामुळे मग केसांची मुळं कमकुवत होतात. यामुळे मग हिवाळ्यात केस गळण्याचं प्रमाण वाढतं (hair fall or hair loss due to winter). या कारणामुळे केसांचं गळणं वाढलेलं असेल तर हा एक घरगुती उपाय (home remedies) तुम्ही नक्कीच करून बघू शकता. घरात सहज उपलब्ध असणारं साहित्य वापरून तुम्ही हा हेअरपॅक (home made hair pack) तयार करू शकता. हा उपाय इन्स्टाग्रामच्या monika_kudrat या पेजवर शेअर करण्यात आला आहे. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा, असं व्हिडिओमध्ये सुचवलं आहे.
केसांचं गळणं कमी करण्यासाठी उपायसाहित्य१. २५० मिली पाणी
२. २ चमचे तांदूळ
३. १ चमचा चहा पावडर
४. २ चमचे मेथी दाणा
कृती१. एका भांड्यात पाणी तापवायला ठेवा. त्यात मेथी दाणे, तांदूळ आणि चहा पावडर टाका.
२. हे मिश्रण ३० ते ४० सेकंद उकळून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा. आणि भांड्यावर झाकण ठेवून द्या.
कपड्यांपासून फर्निचरपर्यंत... सगळं घर होईल चकाचक, बघा घराच्या स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ६ भन्नाट उपयोग
३. मिश्रण कोमट झालं की ते मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यात मध्यम आकाराचा अर्धा कांदा, ३ ते ४ चमचे दही किंवा कच्चं दूध टाका आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
४. हा हेअरपॅक केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर लावा. २ तासांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून घ्या.
५. आठवड्यातून एकदा हा उपाय नियमित करून बघावा. केस गळणं कमी होईल.