त्वचेवर पिंपल्स येण्यापासून ते त्वचा टॅन होईपर्यंत, त्वचेच्या अनेक समस्यांवर आपल्या स्वयंपाक घरातले पदार्थ उपयुक्त ठरत असतात. असंच काहीसं आहे बटाट्याचं. सौंदर्यशास्त्रात बटाट्याला (how to do potato facial at home?) खूप जास्त महत्त्व आहे. बटाट्याला नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखलं जातं. कारण ब्लीच करताना त्वचा उजळविण्यासाठी जे काही घटक वापरले जातात, ते बटाट्यामध्ये निसर्गत: उपलब्ध असतात. त्यामुळे त्वचेचे काळवंडलेपण दूर करण्यासाठी बटाटा खूप उपयुक्त ठरतो. म्हणूनच तर हा एक घरगुती उपाय (home remedies) खास उन्हाळ्यासाठी राखून ठेवा आणि टॅनिंग झाल्यासारखं जाणवलं की लगेच घरच्याघरी पोटॅटो फेशियल करा. (skin care in summer)
त्वचेसाठी बटाट्याचा उपयोग- बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ॲण्टी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे दोन्ही घटक त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहेत.- बटाट्यामधे कॉपर आणि झिंक मोठ्या प्रमाणात असते. त्वचेचे तारुण्य टिकविण्यासाठी आणि त्वचेवर अकाली सुरकुत्या येऊ नयेत, यासाठी हे दोन्ही घटक अतिशय उपयुक्त ठरतात.- बटाट्यामध्ये असणारे पोटॅशियम, मॅग्नेशियमही त्वचेसाठी पोषक आहेत. त्यामुळे बटाट्याचे हे फेशियल एकदा करून बघा आणि त्वचेत होणारा बदल स्वत:च अनुभवा.
कसे करायचे बटाट्याचे फेशियल?- हे फेशियल करताना आपण क्लिंजिंग, स्क्रबिंग, फेसपॅक या सगळ्या गोष्टी करण्यासाठी बटाट्याचाच वापर करणार आहोत.- सगळ्यात आधी क्लिजिंग करावे. यासाठी बटाटा किसून त्याचा रस काढून घ्यावा. दोन चमचे बटाट्याचा रस असेल तर त्यात एक चमचा गुलाबजल टाकावे आणि काही थेंब लिंबाचा रस टाकावा. हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने मसाज करा. लेप वाळल्यानंतर ५ ते १० मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका. - यानंतर स्क्रब करण्यासाठी बटाट्याचा रस आणि मध एकेक चमचा घ्या. त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका. हे मिश्रण व्यवस्थित कालवून त्याने चेहऱ्यावर स्क्रबिंग करा. ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.
- यानंतर थोडा वेळ वाफ घ्या. त्यानंतर बटाट्याच्या रसामध्ये मुलतानी माती टाका. त्यात थोडी चंदन पावडर आणि लिंबाचा रस टाका आणि हा लेप फेसपॅकप्रमाणे चेहऱ्याला लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहऱ्यावरचा लेप सुकला की चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. - अशा पद्धतीने पोटॅटो फेशियल केल्यानंतर चेहऱ्याला टोनर आणि मॉईश्चरायझर लावणे विसरू नका.- फेशियल केल्यानंतर लगेचच उन्हात आणि धुळीमध्ये जाणे टाळावे.