Join us  

मांगटिका एकाजागी राहत नाही, सारखा सरकतो? १ खास सोपी ट्रिक- न हलता मांगटिका बसेल परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2023 3:29 PM

Maang Tika Hack: सणावाराला काही जणी हमखास बिंदी किंवा मांगटिका लावतात. पण ती सारखी सटकते त्यामुळे मग वैताग येऊन जातो. (How do you set Maang Tikka in place?)

ठळक मुद्देदिवाळी येतेच आहे, आता करून पाहा मांगटिका किंवा बिंदी लावण्याचा हा उपाय. 

दिवाळी येतेय. त्यामुळे मग तरुणींची- महिलांची मेकअपचं सामान, दागदागिने यांची खरेदी सुरू झाली आहे. दिवाळीच्या दिवसांत आपल्या मेकअपमध्ये कोणतीच कमी राहायला नको म्हणून अनेक जणी सगळी खरेदी व्यवस्थित यादी करून करतात. अगदी डोक्याच्या मांगटिक्यापासून पायातल्या पैंजणापर्यंत सगळं घेतात. नटताना हौशीने बिंदी किंवा मांग टिका लावतातही. पण चेहरा थोडा जरी हलला तरी तो सारखा हलतो. बऱ्याचदा सटकून खाली येतो (Maang Tika Hack). त्यामुळे फार वैताग येतो आणि आपण मग हौशीने आणलेला मांगटिका काढून टाकतो. असं होऊ नये, म्हणून मांगटिका किंवा बिंदी लावण्याची ही एक खास पद्धत एकदा बघून घ्या (how to put maang tika perfectly?). एकदा लावलेला मांगटिका मुळीच हलणार नाही. (How to set Maang Tikka in place?)

 

मांगटिका हलू नये किंवा निसटू नये म्हणून कसा लावायचा?

मांगटिका लावण्याची एक सोपी पद्धत _mansi_kukreja या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

सिल्क असो की शिफॉन सगळ्या साड्यांवर चालतील असे फॅशनेबल ब्लाऊजचे ३ पर्याय, रेडिमेड आणि आकर्षक

मांगटिका लावताना आपण बऱ्याचदा त्याच्या साखळीमध्ये एक काळी क्लिप अडकवतो आणि ती क्लिप आपल्या केसांमध्ये पक्की बसवतो. पण ती क्लिप हलते आणि मांगटिका किंवा बिंदी सटकते. म्हणूनच आता या व्हिडिओमध्ये सांगितलेली एक खास पद्धत बघा.

 

मांगटिका लावण्यासाठी तुमच्या डोक्याच्या मध्यावरचे जे केस आहेत, त्या केसांची एक छोटीशी बट पुढे घ्या. मांगटिकाच्या साखळीचं जे मोठं छिद्र असतं, त्यातून ती बट घाला आणि पुन्हा मागे वळवा.

कॅमेरासमोर जायचं नसतं तेव्हा फक्त १० मिनिटांत तयार होते प्रियांका चोप्रा, बघा कसा करते फास्ट मेकअप

म्हणजेच त्या छिद्रामध्ये तुमची केसांची बट अडकवा. आता ती बट पुर्णपणे मागे वळवून घ्या आणि मागच्या बाजूने केसांमध्ये ती पिनअप करून टाका. यामुळे मांगटिका अजिबात डोक्यातून खाली ओघळणार नाही. तुमच्या केसांमध्येच अडकवलेला असल्याने तो तिथे अगदी पक्का राहील. दिवाळी येतेच आहे, आता करून पाहा मांगटिका किंवा बिंदी लावण्याचा हा उपाय. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सदिवाळी 2022