आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने मागील ४ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी माधुरीची आजही तितकीच खास जागा आहे. बॉलिवूडमधील धकधक गर्लचे सौंदर्य वयाच्या ५० व्या वर्षीही आजही कायम आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा आहार आणि संतुलित जीवनशैली. याशिवाय मेकअपची उत्पादने वापरुनही माधुरी दीक्षित आजही इतकी सुंदर दिसते याचे कारण म्हणजे ती करत असलेले घरगुती उपाय. माधुरी कायमच केसांसाठी आणि चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी काही ना काही नैसर्गिक उपाय करत असल्याचं आपण ऐकतो (Madhuri Dixit Beauty Secret Home Remedy For Glowing Skin).
माधुरीचं वय तिच्या चमकदार त्वचेकडे पाहून तर अजिबातच जाणवत नाही. चेहऱ्याचं सौंदर्य कायम टिकावं आणि चिरतरुण दिसावं यासाठी माधुरी काकडीचा घरगुती उपाय करते. नुकतीच तिने एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली. घरच्या घरी झटपट करता येणारा आणि नैसर्गिक असा हा सोपा उपाय तुम्हीही नक्की करु शकता. पाहूया माधुरीची त्वचा या वयातही ग्लो करते तो उपाय कसा करायचा आणि त्याचे नेमके काय फायदे होतात....
१. इतकी मोठी अभिनेत्री म्हटल्यावर ती महागडी ब्यूटी प्रॉडक्ट वापरत असेल असे आपल्याला वाटते. पण त्वचा कायम चमकदार राहावी आणि डोळ्यांखाली किंवा चेहऱ्यावर डार्क सर्कल येऊ नयेत यासाठी माधुरी घरगुती उपाय करते.
२. यासाठी माधुरी काकडी आणि दुधाचा वापर करते. जेणेकरुन चेहऱ्याचा कोरडेपणा, निस्तेजपणा कमी होण्यास मदत होते.
कसा करायचा नैसर्गिक उपाय?
काकडीचे पातळ गोल काप करायचे. एका बाऊलमध्ये दूध घ्यायचे आणि त्यात हे काप बुडवायचे आणि मग हे स्लाईस गार होण्यासाठी फ्रिजरमध्ये ठेवायचे. थोडे गार झाल्यावर बाहेर काढून हे स्लाईस चेहऱ्यावर सगळीकडे फिरवायचे.
फायदे
१. दूध हे नैसर्गिक मॉईश्चरायजर असल्याने त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास याचा चांगला उपयोग होतो.
२. तसेच त्वचेचा रंग उजळण्यासाठी आणि सुकरकुत्या कमी होण्यासाठी दूध चांगले काम करते.
३. दूध आणि काकडी हे थोडे वेगळे कॉम्बिनेशन असले तरी त्याच्या वापराने त्वचा छान खुलण्यास मदत होते. मात्र हा प्रयोग करण्याआधी एकदा पॅच टेस्ट करुन मगच प्रयोग करावा.