Lokmat Sakhi >Beauty > माधुरी केसांना लावते घरी बनवलेलं 'हे' स्पेशल तेल; तिच्या दाट-सुंदर केसाचं सोपं सिक्रेट, सोपी कृती

माधुरी केसांना लावते घरी बनवलेलं 'हे' स्पेशल तेल; तिच्या दाट-सुंदर केसाचं सोपं सिक्रेट, सोपी कृती

Madhuri Dixit Healthy Hair Secret : केसांच्या वाढीसाठी माधुरी घरात जे तेल बनवते त्यात नारळाच्या तेलाचा वापर करते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 04:11 PM2024-11-10T16:11:58+5:302024-11-10T16:19:55+5:30

Madhuri Dixit Healthy Hair Secret : केसांच्या वाढीसाठी माधुरी घरात जे तेल बनवते त्यात नारळाच्या तेलाचा वापर करते.

Madhuri Dixit Healthy Hair Secret She Use Coconut Oil With Curry Leaves Methi See Video | माधुरी केसांना लावते घरी बनवलेलं 'हे' स्पेशल तेल; तिच्या दाट-सुंदर केसाचं सोपं सिक्रेट, सोपी कृती

माधुरी केसांना लावते घरी बनवलेलं 'हे' स्पेशल तेल; तिच्या दाट-सुंदर केसाचं सोपं सिक्रेट, सोपी कृती

केस गळण्याची समस्या (Hair Care) सध्या सर्वच मुलींना जाणवते. लाईफस्टाईल चांगली नसणं हे केस गळण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. योग्य पद्धतीने केसांची काळजी न घेतल्यास केसांचं गळणं दिवसेंदिवस वाढू लागतो. सोशल मीडियावर माधुरी दीक्षित चे हेअर केअर रूटीन बरेच व्हायरल होत आहे.  ५७ वर्ष वयातही माधुरीचे केस एकदम दाट आणि मजबूत आहेत. केसांची  काळजी घेण्यासाठी ती घरी बनवलेल्या तेलाचा वापर करते. (Madhuri Dixit Healthy Hair Secret She Use Coconut Oil With Curry Leaves Methi See Video)

केसांच्या वाढीसाठी माधुरी घरात जे तेल बनवते त्यात नारळाच्या तेलाचा वापर करते. नारळाच्या तेलात मेथीचे दाणे, कांदा, कढीपत्ता घालून गॅसवर मंद आचेवर गरम केले जाते. तुम्हीसुद्धा हे तेल तयार करून एका बॉटलमध्ये पॅक करून ठेवू शकता. ज्यामुळे केसांचं गळणं थांबेल.


मेथीच्या दाण्यांचा वापर केसांसाठी फायदेशीर ठरतो.  अनेकजण मेथीच्या दाण्यांचे पाणी रात्रभर भिजवायला ठेवतात आणि सकाळी मेथीचे दाणे वाटू  केसांना लावतात. जवळपास ३० मिनिटं  ते १ तास केसांना लावून ठेवू शकता. नंतर केस शॅम्पूनं धुवा. आठवड्यातून २ वेळा तुम्ही हा हेअर पॅक लावू शकता.

ओटी पोट थुलथुलीत दिसतंय? संध्याकाळी नाश्त्याला 'हा' पांढरा पदार्थ खा; महिन्याभरातच पोट सपाट

कढीपत्ता नॅच्युरल हेअर कंडिशनरचे काम करतो. यातील प्रोटीन आणि बिटा कॅरोटीन केसांना सरळ ठेवण्याचं काम करतात. स्काल्पला पोषण मिळाल्यामुळे केस गळतीही थांबते. कढीपत्त्यामुळे  हेअर फॉल थांबतो आणि केसांच्या वाढीला वेग येतो (ref). कढीपत्त्यामुळे केसांचा कोंडा कमी होतो. स्काल्पवर तयार होणारं फंगस, बॅक्टेरिया नियंत्रणात ठेवता येतात. वेळेआधी पांढरे होणारे केस टाळण्यासाठी कढीपत्ता उत्तम आहे.

हाडांना पोखरते व्हिटामीन B-12 ची कमी; रोज 'या' डाळीचं पाणी प्या, व्हिटामीन बी-१२ भरपूर मिळेल

कढीपत्ता नारळाच्या तेलाबरोबर गरम करून स्काल्पवर लावल्यास स्काल्प साफ होतो. यामुळे स्किन इन्फेक्शन होत नाही. जर तुमच्या केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. ज्यामुळे स्काल्प साफ होईल आणि केस मजबूत होतील. स्काल्पवर होणारे त्रास कमी होऊन केस गळण्याच्या समस्या उद्भवत नाहीत. 

Web Title: Madhuri Dixit Healthy Hair Secret She Use Coconut Oil With Curry Leaves Methi See Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.