Lokmat Sakhi >Beauty > सुंदर केसांसाठी माधुरी दीक्षित लावते ‘हे’ घरगुती तेल; दाट होतील केस, पाहा कसे तयार करायचे..

सुंदर केसांसाठी माधुरी दीक्षित लावते ‘हे’ घरगुती तेल; दाट होतील केस, पाहा कसे तयार करायचे..

Madhuri Dixit Homemade Oil Recipe : जर तुम्हाला लांबसडक दाट, मजबूत केस हवे असतील तर तुम्ही माधुरीने दाखवलेल्या या तेलाचा वापर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 09:18 AM2024-07-03T09:18:02+5:302024-07-03T17:36:48+5:30

Madhuri Dixit Homemade Oil Recipe : जर तुम्हाला लांबसडक दाट, मजबूत केस हवे असतील तर तुम्ही माधुरीने दाखवलेल्या या तेलाचा वापर करू शकता.

Madhuri Dixit Homemade Oil Recipe For Thick And Healthy Hair Hair care Tips By Madhuri Dixit | सुंदर केसांसाठी माधुरी दीक्षित लावते ‘हे’ घरगुती तेल; दाट होतील केस, पाहा कसे तयार करायचे..

सुंदर केसांसाठी माधुरी दीक्षित लावते ‘हे’ घरगुती तेल; दाट होतील केस, पाहा कसे तयार करायचे..

केसांना सुंदर, दाट बनवण्यासाठी  लोक वेगवेगळ्या प्रकार प्रयत्न करत असतात. अभिनेत्री आपल्या सौंदर्याने अनेकांना भूरळ पाडतात. (Skin Care Tips) अभिनेत्रींच्या हेअर स्टाईल्सची चर्चा नेहमीच होत असते. लांब, सुंदर केसांसाठी त्या काय वापरतात याचे नेहमीच सगळ्यांना आकर्षण असते. माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) केसांना लावण्याच्या घरगुती तेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे तेल केसांना लावल्याने केसांची वाढ चांगली होते. (Madhuri Dixit Homemade Oil Recipe For Thick And Healthy Hair)

माधुरी दीक्षित केसांना लावते हे खास हे खास तेल (Madhuri Dixit Hair Secret)

एका कढईत तेल घेऊन ते गरम करून घ्या. तेल गरम करून झाल्यानंतर त्यात मेथीचे दाणे घाला. कढीपत्ता, कांदा घालून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.  हे पदार्थ  गरम झाल्यानंतर  गाळून  हे तेल हाताच्या बोटांनी केसांना लावा.  २ ते ३ तासांनी केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका. केस धुण्यासाठी शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करू शकता. आपल्या केसांचा पोत ओळखून शॅम्पू आणि कंडिशनर केसांना लावा. ज्यामुळे केसांची चांगली वाढ होईल आणि केस लांबसडक दाट होतील.

जर तुम्हाला लांबसडक दाट, मजबूत केस हवे असतील तर तुम्ही माधुरीने दाखवलेल्या या तेलाचा वापर करू शकता. कारण याचा वापर केल्यानंतर तुम्हाला स्वत:ला पुन्हा  केसांना तेल लावावे लागेल. हे तेल स्टोअर करण्यासाठी माधुरीने सांगितले की कमीत कमी २ दिवस स्टोअर करून ठेवा. 

नारळाच्या तेलाचे फायदे (Benefits Of Coconut Oil)

नारळाचे तेल आपल्या केसांना डॅमेज होण्यापासून वाचवते. यात वापरण्यात आलेल्या कढीपत्त्यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. जे  केसांना पोषण देण्यासाठी फायदेशीर ठरतात. मेथीचे दाणे स्काल्पसाठी बरेच फायदेशीर ठरतात ज्यामुळे स्काल्प इरिटेशन,  ड्रॅड्रफ कमी होण्यास मदत होते. हे तेल बनवण्यासाठी तुम्ही कांद्याचा वापरही करू शकता. ज्यामुळे केसांचे गळणे कमी होते. 

केसांची काळजी कशी घ्यावी (How To Take Care Of Hair)

1) केसांच्या चांगल्या वाढीसाठी केस महिन्यातून  एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा  ट्रिम करायला हवेत. ज्यामुळे केसांची चांगली वाढ होईल. केसांना हेअर ड्रायर किंवा हॉट आयर्नचा वापर जास्त केल्याने केस डॅमेज होऊ शकतात.  म्हणून याचा कमीत कमी वापर करा.

2) साध्या टॉवेलचा वापर केल्यास केस डॅमेज होऊ शकतात  ज्यामुळे केस लवकर सुकत नाहीत. म्हणून मायक्रोफायबर्स कापडाचा वापर करा.

थोडं काम केलं की थकवा जाणवतो? किचनमधले 5 पदार्थ रोज खा-हाडांना येईल ताकद-राहाल फिट

3) जर तुम्हाला हेअर फॉल किंवा कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही गरम पाण्याने केस अजिबात धुवू नका. जर स्काल्प हेअर फॉलिकल्स डॅमेज झाले तर केस खराब होतात. केसांना हलक्या गरम किंवा थंड पाण्याने धुवा.  

4) केस जोरात विंचरल्याने केस तुटण्याचा धोका असतो म्हणून हळूहळू केसांना ब्रश करा. जेणेकरून केसांचे नुकसान होणार नाही.

वॉकिंग की रनिंग-पोटाची चरबी घटवण्यासाठी काय करायचं? व्यायामासाठी योग्य वेळ कोणती, पाहा 

5) जर तुम्ही थंड ठिकाणी राहत असाल  तर केसांना मंकी कॅप किंवा स्कार्फने कव्हर करा जेणेकरून केस खराब होणार नाहीत.  केसांना रेग्युलर तेलानं मसाज करा.  केसांना पोषण देण्यासाठी हेअर ऑईल  मसाज  गरजेची असते. 

Web Title: Madhuri Dixit Homemade Oil Recipe For Thick And Healthy Hair Hair care Tips By Madhuri Dixit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.