Lokmat Sakhi >Beauty > माधुरी दीक्षितचं पाहा सिक्रेट, सुंदर केसांसाठी सोपा उपाय- एक केळं आणि..

माधुरी दीक्षितचं पाहा सिक्रेट, सुंदर केसांसाठी सोपा उपाय- एक केळं आणि..

Madhuri Dixit Nene's homemade Banana hair mask : पन्नाशीतही माधुरीसारखे केस काळे आणि दाट राहतील; फक्त केसांसाठी केळीचा वापर कसा करावा? पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2024 03:47 PM2024-03-22T15:47:29+5:302024-03-22T15:49:13+5:30

Madhuri Dixit Nene's homemade Banana hair mask : पन्नाशीतही माधुरीसारखे केस काळे आणि दाट राहतील; फक्त केसांसाठी केळीचा वापर कसा करावा? पाहा..

Madhuri Dixit Nene's homemade Banana hair mask | माधुरी दीक्षितचं पाहा सिक्रेट, सुंदर केसांसाठी सोपा उपाय- एक केळं आणि..

माधुरी दीक्षितचं पाहा सिक्रेट, सुंदर केसांसाठी सोपा उपाय- एक केळं आणि..

एव्हरग्रीन अभिनेत्री अर्थात बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) अजूनही तितकीच सुंदर आणि मोहक दिसते. तिची  दिलखेचक अदाकारी आणि अभिनयाचा चाहतावर्ग फार मोठा आहे. ५६ वयातही माधुरी इतकी तरुण, फिट आणि तिच्या टवटवीत त्वचेबद्दल अनेकांना कुतुहूल वाटते. मुख्य म्हणजे या वयातही तिचे केस दाट आणि काळेभोर कसे? असा प्रश्न मनात येतो (Hair Care).

पन्नाशीनंतरही केस काळेभोर आणि दाट हवे असतील तर, माधुरी दीक्षितने शेअर केलेला केळीचा हेअर मास्क वापरून पाहा (Beauty Secrets). जर तुमचे केस पन्नाशीनंतर सुंदर आणि काळेभोर दिसावे असं वाटत असेल तर, केळीचे घरगुती हेअर मास्क वापरून पाहा. केळीतील नैसर्गिक घटक केसांच्या वाढीस आणि निगा राखण्यास मदत करतील(Madhuri Dixit Nene's homemade Banana hair mask).

केळीचा हेअर मास्क तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

केळी

खोबरेल तेल

मध

अशा पद्ध्तीने तयार करा केळीचा हेअर मास्क

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक पिकलेली केळी घ्या. त्याला चमच्याने मॅश करा. त्यात एक चमचा खोबरेल तेल, अर्धा चमचा मध घालून साहित्य एकजीव करा. अशा प्रकारे केळीचा हेअर मास्क वापरण्यासाठी रेडी.

अशा पद्ध्तीने करा केळीच्या हेअर मास्कचा वापर

१ चमचा बेसन आणि ४ गोष्टी, चेहऱ्यावरचे बारीक केस-डलनेस सगळं गायब झटपट-पाहा उपाय

सर्वप्रथम, केस विंचरून घ्या. नंतर भांग पाडा. बोटावर थोडी पेस्ट घ्या, आणि मुळातून लावत केसांच्या टोकापर्यंत लावा. संपूर्ण स्काल्प आणि केसांना पेस्ट लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. १५ ते २० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवून घ्या. आपण या हेअर मास्कचा वापर आठवड्यातून एक वेळा करू शकता.

केसांसाठी केळीचे फायदे

केळीचा वापर केस मजबूत आणि घनदाट करण्यासाठी होतो. केळीमध्ये फायदेशीर ठरणारे गुणधर्म आढळतात. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी आढळते. तसेच त्यात फायबर, आयर्न, मॅंगनीज आणि प्रोटीन आढळते. ज्याचा फायदा आरोग्यालाही होतो. केळीतील गुणधर्म केस काळे, दाट आणि चमकदार करण्यासाठी करू शकता.

मध

डोक्यातील कोंडा, खाज कमी करण्यासाठी आपण मधाचा वापर करू शकता. मध केसांना हवे असलेले आवश्यक प्रोटीन प्रदान करते. जे केसांच्या पोर्स मजबूत करते. ज्यामुळे केस गळणे, तुटणे, केसांमध्ये कोंडा यासह इतर समस्या दूर राहतात. शिवाय त्यात अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे स्काल्प क्लिन राहते.

घरीच पार्लरसारखं पेडीक्युअर करता येते? टोमॅटो-लिंबाचा सोपा उपाय; टॅनिंग निघेल-पाय चमकतील..

खोबरेल तेल

खोबरेल तेल अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि फॅटी अॅसिड्सने समृद्ध असतात. याच्या वापराने स्कॅल्पमधील रक्त परिसंचरण सुधारते. ज्यामुळे केस मुळांपासून मजबूत होतात. यामुळे केस गळणे थांबते. शिवाय स्काल्पमाधील ब्लड सर्क्युलेशन सुधारल्यामुळे पांढऱ्या केसांची समस्या सुटते. 

Web Title: Madhuri Dixit Nene's homemade Banana hair mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.