Join us  

दाट-शायनी केसांसाठी माधुरी लावते केसांना हा पदार्थ; आठवड्यातून एकदा १ उपाय, सुंदर होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 5:40 PM

Madhuri Dixit Secret Hair Oil : माधुरीच्या केसांचे सगळ्यात महत्वाचे सिक्रेट ते म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल. जर लाईफस्टाईल चांगली असेल तर तुमची त्वचा आणि केस आपोआप चांगली  राहते

अभिनेत्री माधुरी दीक्षित आपली अदाकारी आणि अभिनयामुळे कायम चर्चेत असते. (Beauty Tips) माधुरीच्या अभिनयापेक्षाही तिच्या सौंदर्याच स्तुती अनेकदा केली जाते. (Madhuri Dixit Hair Care Secret) माधुरी आपला फिटनेस  मेंटेन ठेवण्यात कसलीच कसर ठेवत नाही फिटनेस असो किंवा केसांचे आरोग्य ती नेहमी परफेक्ट दिसते. माधुरी दीक्षित त्वचा आणि केसांशी संबंधित फिटनेस टिप्स नेहमीच सोशल मीडियावर शेअर  करत असते. (The Simple Secret of Madhuri's Thick-Black Hairs)

१) माधुरीच्या केसांचे सगळ्यात महत्वाचे सिक्रेट ते म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल. जर लाईफस्टाईल चांगली असेल तर तुमची त्वचा आणि केस आपोआप चांगली  राहते. शरीरातील टॉक्सिन्स  बाहेर पडण्यास मदत होते. स्किन हायड्रेट राहते.  डायट, बायोटीन सारख्या व्हिटामीन सप्लिमेंट्ससशिवाय जास्तीत जास्त पाणी प्या. माधुरीने आपल्या व्हिडिओमध्ये ओमेगा ३ फिश ऑईल आणि टॅबलेट्सबद्दल सांगितले आहे.

२) केस लांब वाढले की  खालच्या बाजून विरळ होऊ लागतात. अशावेळी केस ट्रीम करणं महत्वाचे असते. केसांवर ड्रायर आणि हॉट आयर्नचा वापर केल्याने हेअर डॅमेज होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच रेग्युलरली  कट करा आणि हिटींग टुल्सचा वापर कमी करा.

३) साध्या टॉवेलचा वापर केसांवर करू नका. मायक्रोफायबरचा  नेहमी वापरत असलेल्या टॉवेलचा वापर करा. गरम टॉवेल केसांना डॅमेज करतो. ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

४) केस  जास्त गरम पाण्याने धुवू नका. केसांमध्ये हेअर फॉलची समस्या  असेल तर केस गरम पाण्याने धुवू नका स्काल्पमध्ये हेअर फॉलिकल्स डॅमेज झाले असतील तर हलक्या गरम किंवा थंड पाण्याने धुवा.

पोटभर भात खा १ किलो पण वजन वाढणार नाही; भात करण्याची १ सोपी पद्धत, स्लिम दिसाल

५) केस हळूहळू विंचरा. केस जोरात फणीने विंचरलेतर गुंता होऊन तुटू शकतात म्हणून हळूहळू कंगव्याच्या साहय्य्याने ब्रश करा. जेणेकरून केसांचे नुकसान होणार नाही.

६) थंड  ठिकाणी केस कव्हर करून ठेवा. जेव्हा तुम्ही कोणत्याही थंड ठिकाणी असता तेव्हा केस मंकी कॅप किंव स्कार्फने कव्हरर करून ठेवा जेणेकरून केस खराब होणार नाही.

चेहऱ्यावर येईल तेज, करा चमचाभर दह्याचा १ उपाय, ५ मिनिटांत ग्लो येईल-पिंपल्सही जातील

७) तेलाने नियमित मसाज करा. रेग्युलर केसांची हेडमसाज केल्याने केसांना पोषण मिळते. त्यासाठी नारळाचे तेल, कढीपत्ता, मेथी दाणे आणि १ कांदा घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा आणि नंतर केसांना लावा.  

टॅग्स :ब्यूटी टिप्समाधुरी दिक्षितहेल्थ टिप्सकेसांची काळजी