आपल्या त्वचेची, केसांची काळजी सगळ्यांनाच असते. मग ते मोठे सेलिब्रिटी असो किंवा मग सर्वसामान्य महिला असो. आपल्यापैकी बहुतांश जणांचा एक समज असतो की जे मोठे सेलिब्रिटी असतात, ते त्यांच्या केसांसाठी, त्वचेसाठी फक्त महागडे कॉस्मेटिक्सच वापरतात. हे बऱ्याचअंशी खरं असलं तरी सेलिब्रिटींचं सौंदर्य हे फक्त त्या कॉस्मेटिक्सवरच अवलंबून नसतं. कारण ते त्यांचा आहार, व्यायाम या गोष्टीही सांभाळत असतात. शिवाय काही घरगुती नैसर्गिक उपाय करण्यावरही त्यांचा भर असतो. त्यापैकीच एक आहे माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित तिच्या केसांना कोणतं तेल लावते, याविषयीचा तिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (hair care tips by Madhuri Dixit)
माधुरी दीक्षित केसांना कोणतं तेल लावते?
काही दिवसांपुर्वी जया बच्चन यांनी त्या तरुणपणी त्यांच्या केसांची, त्वचेची काळजी कशा घ्यायच्या याविषयीचे काही उपाय सांगितले होते. असाच माधुरी दीक्षितचाही एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
इस्त्रीला काळपट- चॉकलेटी डाग पडले? २ सोप्या ट्रिक पाहा- एका मिनिटांत इस्त्री नव्यासारखी दिसेल
anupriyaa_srivastavaa या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यामध्ये माधुरीने ती केसांसाठी कशा पद्धतीने घरगुती तेल तयार करते ते सांगितलं आहे. हे तेल करण्यासाठी माधुरीने खोबरेल तेल वापरले असून त्यामध्ये ३ घरगुती पदार्थ टाकले आहेत. हे तेल कसं तयार करायचं ते पाहा...
केसांच्या वाढीसाठी माधुरी दीक्षित सांगतेय खास उपाय
माधुरी दीक्षित जे तेल तयार करते आहे, त्यासाठी तिने अर्धी ते पाऊण वाटी खोबरेल तेल घेतले आहे.
सगळ्यात आधी एका पातेल्यात खोबरेल तेल टाका आणि ते गॅसवर गरम करायला ठेवा.
उन्हामुळे त्वचा काळवंडणार तर नाहीच, उलट आणखी चमकून उठेल- केशर वापरून करा 'हा' उपाय
यानंतर त्या तेलामध्ये १० ते १५ कडिपत्त्याची पाने, १ टेबलस्पून मेथ्या आणि १ लहान ते मध्यम आकाराचा कांदा किसून टाका.
या तेलाला चांगली उकळी येऊ द्या. हळूहळू तेलाचा रंग बदलेल आणि कांदा चॉकलेटी रंगाचा होऊन कडक होईल. असं झालं की गॅस बंद करा.
हे तेल थंड झाल्यानंतर एका बाटलीत गाळून घ्या. दोन दिवस ते तसंच राहू द्या आणि त्यानंतर या तेलाने आठवड्यातून दोन वेळा केसांना मसाज करा. २ ते ३ तासांनी केस धुवून घ्या. केस दाट- लांब होतील.