बॉलीवूडची (Bollywood) धकधक गर्ल (Dhakdhak Girl) अर्थात माधुरी दिक्षित (Madhuri Dixit) लवकरच साठीत प्रवेश करेल. माधुरी दिक्षित एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयातून आणि सौंदर्यातून प्रेक्षांची मने जिंकली (Skin care Tips). तिचा चाहतावर्ग अजूनही तिच्या अदांवर फिदा आहे. माधुरी अजूनही तितकीच फिर आणि सुंदर दिसते.
सध्या ती भूल भुलैया ३ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती अजूनही तितकीच यंग आणि ब्यूटीफुल दिसते. पण तिच्या सौंदर्यमागचं रहस्य काय? तिशीतल्या अभिनेत्रींना लाज वाटेल असं तिचं सौंदर्य नक्की खुलतं कशामुळे? जर आपल्यालाही माधुरीप्रमाणे दिवाळीत चमकदार आणि सुंदर दिसायचं असेल तर, हा घरगुती फेसपॅक ट्राय करून पाहा. यामुळे आपल्याला इन्स्टंट ग्लो मिळेल(Madhuri Dixit Shares Her Skincare Tips and Facepack).
चमकदार त्वचा हवी असेल तर, हा फेसपॅक लावून पाहा
- त्वचेची काळजी घेण्याव्यतिरीक्त माधुरी का घरगुती फेसपॅकचाही वापर करते. घरगुती गोष्टींमुळे चेहऱ्यावर तेज येते. शिवाय चेहऱ्याला पोषण मिळते. तिला २ फेसपॅक आवडतात. या घरगुती फेसपॅकमुळे त्वचा तुकतुकीत आणि फ्रेश दिसते.
थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा
- पहिले फेसपॅक करण्यासाठी एका बाऊलमध्ये ओटमिल घ्या. त्यात मध आणि दूध घालून मिक्स करा. जर आपली त्वचा तेलकट असेल तर, आपण दुधाऐवजी गुलाबजल वापरु शकता. अशा प्रकारे नैसर्गिक फेसपॅक तयार.
- तयार फेसपॅक चेहरा धुवून लावा. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते, मॉइश्चरायझ होते, यासह मऊ देखील राहते.
हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी
- दुसरा फेसपॅक करण्यासाठी एका बाऊलमध्ये दूध, मध, एलोवेरा जेल आणि एसेंशिअल ऑइल घालून मिक्स करा. तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा. नंतर काहीवेळाने चेहरा धुवून घ्या. यातील पौष्टीक घटकेमुळे चेहऱ्याला पुरेपूर पोषण मिळते.
- जर आपल्याला इन्स्टंट ग्लो हवा असेल तर, काकडीचा वापर करा. काकडी दुधात भिजवा आणि फ्रिजरमध्ये ठेवा. काकडीचे काप संपूर्ण चेहऱ्यावर ठेवा. यामुळे चेहरा फ्रेश आणि टवटवीत दिसेल.