Hair Care : बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) या वयातही इतकी सुंदर दिसते की, आजकालच्या तरूणीही लाजतील. माधुरी दीक्षित केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नाही तर तिच्या दाट आणि चमकदार केसांसाठीही फेमस आहे. अशात अनेक तरूणींना या सुंदर केसांचं रहस्य जाणून घ्यायचं असतं. माधुरीनं स्वत: तिच्या दाट आणि चमकदार केसांचं रहस्य सांगितलं आहे. माधुरी केसांसाठी एका खास तेलाचा वापर करते. या तेलामुळं केस काळे आणि दाट राहतात. चला जाणून घेऊ काय आहे माधुरीच्या सुंदर केसांचं रहस्य...
होममेड ऑइल
माधुरी केसांना लावण्यासाठी घरीच एक खास तेल तयार करते. हे तेल बनवण्यासाठी अर्धा कप खोबऱ्याचं तेल, १ चमचा मेथीचे दाणे, १ कांदा आणि १० ते १० कढीपत्ते.
तेल बनवण्याची पद्धत
आधी एक कढई घ्या. त्यात तेल गरम करा. नंतर तेल गरम झाल्यावर त्यात कापलेला कांदा, मेथीचे दाणे, कढीपत्ते टाका. तेलाचा रंग बदलल्यावर थंड होऊ द्या. जेव्हा हे तेल थंड होईल एका बॉटलमध्ये स्टोर करा.
या तेलाचे फायदे
खोबऱ्याच्या तेलामुळे केस डॅमेज होत नाहीत. तर कढीपत्त्यात केसांसाठी आवश्यक अॅंटी-ऑक्सिडेंट आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. मेथीच्या दाण्यांमुळे केस मूळापासून मजबूत होतात. खोबऱ्याचं तेल, कढीपत्ते आणि मेथीचे दाणे यामुळे डोक्याच्या त्वचेमधील इरिटेशन आणि कोंडाही कमी होतो. या तेलानं केसगळतीची समस्या होत नाही.
कुणी वापरू नये हे तेल?
जर तुम्ही केसगळतीवर उपचार घेत असाल, त्यासाठी काही औषधं घेत असाल तर या तेलाचा वापर करू नये. जर या तेलाचा वापर करायचा असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.