Lokmat Sakhi >Beauty > माधुरी दिक्षित सांगतेय तिचं ब्यूटी सिक्रेट, ग्लोइंग स्किनसाठी का प्यावं नारळाचं पाणी..

माधुरी दिक्षित सांगतेय तिचं ब्यूटी सिक्रेट, ग्लोइंग स्किनसाठी का प्यावं नारळाचं पाणी..

Madhuri Dixit's beauty secret: वयाच्या पन्नाशीतही माधुरी दिक्षित एवढी फिट (fitness) आणि सुंदर (glowing skin)कशी काय दिसते, याचं सिक्रेट तिने स्वत:च तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 08:03 PM2021-11-23T20:03:26+5:302021-11-23T20:04:29+5:30

Madhuri Dixit's beauty secret: वयाच्या पन्नाशीतही माधुरी दिक्षित एवढी फिट (fitness) आणि सुंदर (glowing skin)कशी काय दिसते, याचं सिक्रेट तिने स्वत:च तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. 

Madhuri Dixit's beauty secret, benefits of drinking coconut water | माधुरी दिक्षित सांगतेय तिचं ब्यूटी सिक्रेट, ग्लोइंग स्किनसाठी का प्यावं नारळाचं पाणी..

माधुरी दिक्षित सांगतेय तिचं ब्यूटी सिक्रेट, ग्लोइंग स्किनसाठी का प्यावं नारळाचं पाणी..

Highlightsमाधुरीने तिचं सौंदर्याचं सिक्रेट नुकतंच इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

मागच्या कित्येक वर्षांपासून माधुरी दिक्षित कोणत्याही सिनेमात दिसलेली नाही. असं असलं तरी माधुरीचे चर्चे मात्र कधीच कमी होत नाहीत. यावरूनच तर दिसून येते तिची अफाट लोकप्रियता. तिच्या पहिल्या चित्रपटात ती जेवढी सुंदर दिसत होती, तेवढीच सुंदर ती आजही तिच्या चाहत्यांना वाटते. 'हम आपके है कोन' या चित्रपटानंतर तर तिची लोकप्रियता वेगाने वाढत गेली आणि आजही ती कायम आहे. माधुरीचं वय तिच्या तब्येतीकडे आणि तिच्या चमकदार त्वचेकडे (skin care)पाहून तर अजिबातच जाणवत नाही.

 

ती काय बाबा, अभिनेत्री आहे. एकापेक्षा एक महागडे ब्यूटी प्रोडक्ट्स ती वापरत असणार, मग दिसणारंच ना ती सुंदर... असा विचार मनात डोकावणं अगदी साहजिक आहे. पण महागडे प्रोडक्ट वापरून खरंच काही रूप येत नाही, हे आपण प्रत्येकीने कधी ना कधी अनुभवलं आहेच. जर खरोखरच त्वचेचा पोत सुधारायचा असेल, फिट आणि सुंदर दिसायचं असेल, तर जीवनशैलीत आणि आहारात काही बदल करणं गरजेचं आहे. हेच तर करतेय माधुरी. माधुरीने तिचं सौंदर्याचं सिक्रेट नुकतंच इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

आजी सांगायची, रोज बेसन हळद साय लाव चेहऱ्याला.. तेच करा, बेसनाचे ३ फेसपॅक, चेहरा नितळ तजेलदार

 

माधुरीने एक फोटो इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला असून यामध्ये ती एका खुर्चीवर बसलेली आहे आणि तिच्या समोरच्या टेबलवर नारळ ठेवलेलं आहे. माधुरी म्हणजे दररोज एका नारळाचं पाणी पिणे हेच तिच्या फिटनेसचं आणि ग्लोईंग स्किनचं गुपित आहे. माधुरी म्हणते तिच्या रोजच्या आहारात नारळाचं पाणी असतंच. दररोज नियमितपणे नारळपाणी प्यायल्यामुळे मी निरोगी तर राहतेच, पण माझा स्ट्रेस, ताणतणाव, थकवा कमी होण्यासही खूप मदत होते. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारळाचं पाणी माझी त्वचा चमकदार ठेवण्यासाठीही मदत करते, असंही माधुरीने सांगितलं आहे. माधुरीने सांगितलेला हा सोपा उपाय प्रत्यक्षात आणायला काहीच हरकत नाही. केवळ चमकदार त्वचेसाठीच नव्हे, तर इतरही अनेक आरोग्यदायी फायदे मिळविण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी नारळाचं पाणी नेहमीच प्यावं.

 

नारळ पाणी पिण्याचे फायदे 
Benefits of coconut water

- वजन कमी करण्यासाठी (weightloss) नारळाचे पाणी उपयुक्त ठरते.
- नारळ पाणी हे नैसर्गिक पद्धतीने शरीर डिटॉक्स (detox) करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कारण नारळ पाणी घेतल्याने शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. अपायकारक पदार्थ बाहेर पडल्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

चॉकलेट खाताना गिल्ट कशाला, खा बिंधास्त! रोज 1 चॉकलेट, वेटलॉससाठी गोड उपाय

- नारळ पाण्यात प्रोटीन्स, मिनरल्स आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं.
- नारळ पाणी नियमित प्यायल्यामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास कमी होतो.
- थायरॉईडचे प्रमाण संतूलित ठेवण्यासाठी नारळपाणी उपयुक्त ठरते.
 

Web Title: Madhuri Dixit's beauty secret, benefits of drinking coconut water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.