Lokmat Sakhi >Beauty > धकधक गर्ल माधुरी दीक्षितसारखं चेहऱ्यावर येईल तेज, रोज फक्त १ गोष्ट चेहऱ्याला लावा

धकधक गर्ल माधुरी दीक्षितसारखं चेहऱ्यावर येईल तेज, रोज फक्त १ गोष्ट चेहऱ्याला लावा

Madhuri Dixit’s Everyday Makeup Routine : तिशीनंतरही चिरतरुण दिसायचं, मग महागडे प्रॉडक्ट्स सोडा; एक स्वस्तात-मस्त गोष्ट लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2024 06:51 PM2024-01-11T18:51:22+5:302024-01-11T18:55:10+5:30

Madhuri Dixit’s Everyday Makeup Routine : तिशीनंतरही चिरतरुण दिसायचं, मग महागडे प्रॉडक्ट्स सोडा; एक स्वस्तात-मस्त गोष्ट लावा

Madhuri Dixit’s Everyday Makeup Routine | धकधक गर्ल माधुरी दीक्षितसारखं चेहऱ्यावर येईल तेज, रोज फक्त १ गोष्ट चेहऱ्याला लावा

धकधक गर्ल माधुरी दीक्षितसारखं चेहऱ्यावर येईल तेज, रोज फक्त १ गोष्ट चेहऱ्याला लावा

जगात प्रत्येक गोष्टी नश्वर आहे. त्याचप्रमाणे वय वाढत गेलं की, आपण आहोत तसे तरुण दिसणार नाही. बरेच बदल घडतात. मुख्य म्हणजे हे बदल चेहऱ्यावर ठळक दिसून येतात. तिशी ओलांडल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. काही लोकांना वयाच्या आधीच या गोष्टींना सामोरे जावे लागते. अशावेळी बरेच महिला विविध ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात.

बहुतांश प्रॉडक्ट्समध्ये केमिकल रसायनांचा वापर होतो. ज्यामुळे स्किन आणखीन खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही (Skin care Routine). पण आपण त्वचेची योग्य काळजी नैसर्गिक उत्पादनांचा वापर करूनही घेऊ शकता. त्यासाठी महागड्या प्रॉडक्ट्सची गरज भासणार नाही. फक्त चेहऱ्यावर झोपण्यापूर्वी ३ पैकी १ गोष्ट लावा(Madhuri Dixit’s Makeup Routine).

व्हिटॅमिन सी समृद्ध टोमॅटो

त्वचेसाठी आपण टोमॅटोचा वापर करून पाहू शकता. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-के असते. तरुण दिसण्यासाठी चेहऱ्यावरील कोलेजनकडे लक्ष देणं गरजेचं आहे, आणि टोमॅटोमुळे चेहऱ्यावरील कोलेजन तयार होते. यासाठी नियमित चेहऱ्यावर टोमॅटोचा रस लावा. यामुळे चेहऱ्यावरील कोलेजन बुस्ट होईल, व चेहरा कायम चमकदार दिसेल.

थोडंसं खोबरेल तेल आणि चिमूटभर कांद्याचं बी, केसांच्या सर्व समस्यांवर एकच जबरदस्त इलाज

खोबरेल तेल

खोबरेल तेलाने फक्त केसच नव्हे तर त्वचाही उजळते. खोबरेल तेल त्वचेच्या अनेक समस्या दूर करते. त्याचबरोबर झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्याने कोरड्या त्वचेपासूनही सुटका होते. खोबरेल तेलात अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे त्वचेची मजबूती आणि लवचिकता राखण्यासाठी काम करतात. त्वचा निस्तेज होणे, सुरकुत्या पडणे यासारख्या अनेक समस्याही कमी होतात.

केसांना जास्त तेल लावले की गळतात? नक्की खरं काय? केसांना कितीवेळ आणि कधी तेल लावावे?

गुलाब जल

त्वचेवर तेजस्वी ग्लो हवं असेल तर, नियमित गुलाब जल लावा. झोपण्यापूर्वी अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध गुलाब पाणी लावल्याने चेहऱ्याला पोषण मिळते. शिवाय मॉइश्चरायजही करते. जर त्वचेची पीएच पातळीचे संतुलन बिघडले असेल तर, गुलाब पाणी लावा. यामुळे त्वचेची पीएच पातळी सुधारते. शिवाय स्किन कायब गुलाबाच्या पाकळ्यांसारखी मुलायम होते.

Web Title: Madhuri Dixit’s Everyday Makeup Routine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.