Join us  

५२ हजारांची साडी आणि ७ हजारांचे झुमके, बघा माधुरी दीक्षितचा चंदेरी ऑर्गेंझा साडी लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 1:15 PM

Viral Look of Actress Madhuri Dixit: अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या ट्रॅडिशनल साडी लूकची नेहमीच चर्चा होत असते. आता हा बघा तिचा आणखी एक व्हायरल झालेला सुंदर लूक..

ठळक मुद्दे दिवाळीच्यानिमित्ताने मागच्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षितचा एक साडी लूक सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) सौंदर्य आणि तिचे हास्य म्हणजे तिची खरी ओळख. चेहऱ्यावरील गोडव्यामुळे आणि सदा प्रसन्न दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वामुळे पन्नाशीला आली तरी माधुरी सुंदरच वाटते. तिचं खरं सौंदर्य बहरून येतं ते ट्रॅडिशनल कपड्यांमध्ये आणि ते ही खासकरून साडीमध्ये, असं तिच्या चाहत्यांना नेहमीच वाटतं. म्हणूनच सणासुदीच्या दिवसांत किंवा लग्नसराईमध्ये अनेक जणी तिचा साडी लूक फॉलो करण्यासाठी उत्सूक असतात. त्यामुळेच दिवाळीच्यानिमित्ताने मागच्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षितचा एक साडी (Madhuri Dixit's ivory saree worth Rs. 52k) लूक सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

 

माधुरीच्या साडीची खासियत माधुरीचा हा फोटो तसा जूना आहे. पण दिवाळीनिमित्त या साडीची आणि तिच्या दिसण्याची चांगलीच चर्चा रंगलेली हाेती. माधुरीची ही साडी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर पुनीत बालाना यांच्या कलेक्शनमधली असून ऑर्गेंझा प्रकारातली आहे. तर साडीवरचे ब्लाऊज अतिशय भरजरी असून ते चंदेरी सिल्कचे आहे.

दिवाळीचा फराळ खाऊन वजन वाढलं, अंग जड पडलं? करिना कपूर करतेय तो व्यायाम करा..

साडीचा रंग आयव्हरी असून तो हलकासा पिवळट रंगाकडे झुकणाराही वाटतो. साडी पुर्णपणे प्लेन असून तिच्या बॉर्डरवर मात्र गोटा- मरोडी वर्क या प्रकारातली एम्ब्रॉयडरी आहे. साडी आणि ब्लाऊजचा रंग एकदम विरोधी असून ब्लाउज डार्क जांभळ्या रंगाचे आहे. ब्लाउजवर सुद्धा गोटा- मरोडी या प्रकारातली सोनेरी रंगातली एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. पुनीत बालाना यांच्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर या साडीची किंमत तब्बल ५२, ५०० रुपये दाखविण्यात येत आहे.

 

सात हजारांचे झुमके नेमके आहेत कसे?या साडीवर माधुरीने Kishandas & Co. या ब्रॅण्डचे अनकट डायमंड प्रकारातले झुमके घातले असून त्यांची किंमत तब्बल साडेसात हजार रुपये आहे.

सासूबाईंचा पराठे खाण्याचा प्रेमळ आग्रह, कतरिनाला डाएटची चिंता; मग कसा सोडवला प्रश्न? कतरिना सांगते..

या झुमक्यांचा बेस रंग गोल्डन असून त्यावर छोटे- छोटे डायमंड्स सुरेख पद्धतीने लावण्यात आले आहेत.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनमाधुरी दिक्षित