Lokmat Sakhi >Beauty > माधुरी दीक्षित टोनर म्हणून वापरते चक्क 'हा' पदार्थ, स्वस्तात मस्त उपाय - पन्नाशीतही दिसाल तिच्यासारखे ग्लोइंग...

माधुरी दीक्षित टोनर म्हणून वापरते चक्क 'हा' पदार्थ, स्वस्तात मस्त उपाय - पन्नाशीतही दिसाल तिच्यासारखे ग्लोइंग...

Tips & Tricks Madhuri Dixit Secret Toner To Glowing Skin In Her 50 year Age : Madhuri Dixit's skincare routine for healthy skin in your 50s, From using rose water to her secret cleansing trick : How To Make Rose Water Toner At Home : माधुरीचा डेली स्किन केअर फंडा करेल तुमची त्वचा यंग आणि ग्लोइंग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2025 11:25 IST2025-04-18T07:16:12+5:302025-04-18T11:25:48+5:30

Tips & Tricks Madhuri Dixit Secret Toner To Glowing Skin In Her 50 year Age : Madhuri Dixit's skincare routine for healthy skin in your 50s, From using rose water to her secret cleansing trick : How To Make Rose Water Toner At Home : माधुरीचा डेली स्किन केअर फंडा करेल तुमची त्वचा यंग आणि ग्लोइंग...

Madhuri Dixit's skincare routine for healthy skin in your 50s, From using rose water to her secret cleansing trick How To Make Rose Water Toner At Home | माधुरी दीक्षित टोनर म्हणून वापरते चक्क 'हा' पदार्थ, स्वस्तात मस्त उपाय - पन्नाशीतही दिसाल तिच्यासारखे ग्लोइंग...

माधुरी दीक्षित टोनर म्हणून वापरते चक्क 'हा' पदार्थ, स्वस्तात मस्त उपाय - पन्नाशीतही दिसाल तिच्यासारखे ग्लोइंग...

बॉलिवूडमधील 'धक - धक गर्ल' माधुरी दीक्षितचे सौंदर्य आणि फिटनेस म्हणजे लाजवाब. माधुरीने वयाची पन्नाशी ओलांडली तरी देखील आजही तिच्या सौंदर्याचे अनेकजण चाहते आहेत. माधुरी (Tips & Tricks Madhuri Dixit Secret Toner To Glowing Skin In Her 50 year Age) कायमच तिच्या फिटनेस आणि सौंदर्याची विशेष काळजी घेताना दिसून येते. माधुरी कोणत्याही गोष्टीचा कंटाळा न करता आपले स्किनकेअर रुटीन अगदी आनंदाने रोज फॉलो करते(Madhuri Dixit's skincare routine for healthy skin in your 50s, From using rose water to her secret cleansing trick).

वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तिच्या चेहऱ्यावरील तेज आणि चमक इतकी आहे की प्रत्येकीला तिच्या सुंदर त्वचेचे सिक्रेट जाणून घेण्याची उत्सुकता आहेच. तिच्या स्किन केअर रुटीनमध्ये, ती क्लिंझिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग असे काही बेसिक (How To Make Rose Water Toner At Home) उपाय नेहमी करते. अलिकडेच, माधुरीने तिच्या स्किनकेअर रूटीनशी संबंधित एक खास घरगुती उपाय शेअर केला आहे, जो ती तिच्या डेली स्किनकेअर रूटीनमध्ये अगदी न चुकता करतेच. माधुरीचा हा स्किन केअर फंडा नेमका आहे तरी काय ते पाहूयात. 

माधुरीचा स्किन केअर फंडा... 

टीओआयने दिलेल्या माहितीनुसार, माधुरी गुलाब पाण्यापासून बनविलेल्या घरगुती टोनरचा वापर करते, आणि हेच तिच्या चमकदार त्वचेचे खास सिक्रेट आहे. माधुरी दीक्षित वापरते तास गुलाब पाण्याचा घरगुती टोनर घरीच बनवायला खूप सोपा आहे. यासाठी, ताज्या गुलाबाच्या पाकळ्या डिस्टिल्ड वॉटरमध्ये घालून, हे सगळे मिश्रण हलकेच मंद आचेवर ठेवून उकळवून घ्यावे. जेव्हा गुलाबाच्या पाकळ्यांचा रंग पाण्यात हळूहळू उतरतो, तेव्हा गॅस बंद करून हे टोनर गाळणीच्या  मदतीने गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून स्टोअर करून ठेवावे. हे टोनर दररोज सकाळी आणि रात्री त्वचेवर स्प्रे करता येते किंवा कापसाच्या पॅडच्या मदतीने थेट त्वचेवर देखील लावता येते.

चेहऱ्यावर येईल नॅचरल गुलाबी ग्लो, पाहा 'ब्लश' लावण्याची सेलिब्रिटी टेक्निक! गाल दिसतील आलिया-दीपिकासारखे...

गुलाब पाण्याचे हे टोनर त्वचेला हायड्रेट करते आणि त्वचेचे पीएच संतुलन राखते. उन्हाळ्यात त्वचेची होणारी जळजळ, सूज आणि रॅशेज यासारख्या समस्यांपासून आराम देते. शिवाय, हे टोनर त्वचेला गारवा देते आणि त्वचा ताजी, फ्रेश ठेवण्यास मदत करते. माधुरी दीक्षित याचा वापर मेकअप रिमूव्हर म्हणूनही करते. प्रथम ती मेकअप काढण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह रोझ वॉटर टोनर वापरते, नंतर फेस वॉश केल्यानंतर ती ते पुन्हा चेहऱ्यावर लावते जेणेकरून त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी वाटेल.

हनुवटी आणि ओठावरचे केस सतत वाढणं होईल बंद, प्या हे घरगुती नॅचरल ड्रिंक...

टोनरनंतर, माधुरी दीक्षित व्हिटॅमिन 'सी' सीरम, हलके मॉइश्चरायझर, डोळ्यांखालील क्रीम आणि लिप बाम वापरते. या संपूर्ण स्किनकेअर रूटीनमुळे, तिची त्वचा ताजी, टवटवीत आणि चमकदार होतेच, शिवाय वृद्धत्वाचे परिणामही कमी करते.

१ चमचा खोबरेल तेलात मिसळा ‘या’ ५ पैकी १ पदार्थ, तुमचं तारुण्य परत आणणारी जादूई युक्ती!

अशाप्रकारे, माधुरी दीक्षित हे सिद्ध करते की सुंदर आणि निरोगी त्वचा मिळविण्यासाठी महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सपेक्षा नैसर्गिक आणि घरगुती उपायांचा वापर करणे कधीही उत्तमच. जर तुम्हालाही केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सशिवाय  चमकदार त्वचा हवी असेल, तर माधुरीचे हे गुलाबपाण्याचे टोनर नक्कीच वापरून पहा.

Web Title: Madhuri Dixit's skincare routine for healthy skin in your 50s, From using rose water to her secret cleansing trick How To Make Rose Water Toner At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.