Join us  

रोज प्या तुळशीचा चहा; चेहेऱ्यावर येतं तेज आणि त्वचा निरोगी! हा चहा रोजच हवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:57 PM

आपण घेत असलेल्या चहाचा उपयोग आपल्या त्वचेसाठीही होवू शकतो फक्त त्यासाठी चहाची पध्दत आणि त्यातले घटक मात्र बदलावे लागतील. तुळशीचा चहा हा त्वचा नैसर्गिकपणे चमकदार करण्यासाठी खूप मदत करतो.

ठळक मुद्देतुळस घालून केलेल्या चहाची चव जेवढी उत्तम असते तितकेच या चहाचे फायदे देखील आहेत. तुळशीची पानातले अँण्टिऑक्सिडण्टस चेहेर्‍यावरच्या सुरकुत्याही कमी करतात. तुळशीच्या पानांच्या चहामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

चहा हा आरोग्यास हानिकारक की फायद्याचा हा विषयच नाही. दिवसाची सुरुवात ही चहानेच होते ही जवळ जवळ प्रत्येकाचीच सवय. शिवाय दिवसभरात ऊर्जेसाठी मधून मधून चहा हवाच असतो. पण आपण घेत असलेल्या चहाचा उपयोग आपल्या त्वचेसाठीही होवू शकतो फक्त त्यासाठी चहाची पध्दत आणि त्यातले घटक मात्र बदलावे लागतील. तुळशीचा चहा हा त्वचा नैसर्गिकपणे चमकदार करण्यासाठी खूप मदत करतो. तुळस घालून केलेल्या चहाची चव जेवढी उत्तम असते तितकेच या चहाचे फायदे देखील आहेत. तुळशीच्या पानात रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याची ताकद असते. शिवाय तुळशीची पानं आपली त्वचा जपण्यासाठीही महत्त्वपूर्ण आहेत.

तुळशीचा चहा कसा करणार?

त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यासाठी तुळशीचा चहा करण्याची विशिष्ट पध्दत आहे. पण ही पध्दत आहे खूप सोपी.तुळशीच्या पानाचा चहा करण्यासाठी एका भांड्यात एक कप पाणी घालावं. पाण्यात तीन चार तुळशीची पानं घालावीत. नंतर हे भांड गॅसवर ठेवून पाणी उकळून घ्यावं. पाणी उकळलं की ते थोड्या वेळ झाकून ठेवावं. नंतर हे पाणी गाळून घ्यावं. त्यात एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस घालावा. हा चहा आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेससाठी फायदेशीर असतो.

तुळशीच्या चहाचे फायदे1. तुळशीच्या पानांमधे मोठ्या प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस असतात. हे अँण्टिऑक्सिडण्टस त्वचा उजळ होण्यासाठी फायदेशीर ठरतात. शिवाय तुळशीची पानातले हे अँण्टिऑक्सिडण्टस चेहेर्‍यावरच्या सुरकुत्याही कमी करतात. म्हणूनच तुळशीची पानं घालून दिवसातून एकदा तरी चहा घ्यायला हवा.

2. तुळशीच्या पानांच्य चहामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. त्यामुळे देखील त्वचा निरोगी होण्यास मदत होते. लिव्हरचं काम सुरळीत होण्यासही तुळशीच्या पानांचा चहा मदत करतो. तुळशीच्या चहामुळे अनेक संसर्गजन्य आजारांपासूनही आरोग्याचं रक्षण होतं.अशा प्रकारे तुळशीच्या पानांचा चहा फक्त त्वचेसाठीच नाही तर एकूणच आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे.