कांदा हा आपल्या आहारातील सर्वात महत्वाचा भाग आहे. कांद्याच्या फोडणीशिवाय भाजीतली चव वाढत नाही. आहारासोबत कांद्याचा सॅलडमध्ये व जेवणासोबत तोंडी कच्चा खाण्यासाठी होतो. जेवणाची रंगत कांदा तर वाढवतोच. यासह त्यातील गुणधर्म आपल्या शरीराला उपयुक्त ठरतात. कांद्याचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
यासह त्याचा वापर त्वचा आणि केसांसाठीही केला जातो. महिलांचे सौंदर्य वाढवण्याचे काम कांदा करतो. कांदा रडवत जरी असला तरी, त्याचे फायदे आपल्या कामी येतात. कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक सारखे गुणधर्म भरपूर असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. कांद्याचा रस टाळूला मजबूत करते. त्यामुळे केसांना रस लावण्याचा सल्ला दिला जातो.
केसांना कांद्याचा रस लावण्याचे फायदे
कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण अधिक आढळते. ज्यामुळे हेअर फॉलपासून सुटका मिळते. यासह स्काल्पमधील कोंडा दूर होण्यास मदत मिळते. कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे केसांची वाढ होते. यासह केस पांढरे होण्यापासून बचाव होतो. केसांची मुळे घट्ट होतात. यासह काळेभोर व दाट होतात.
अशा प्रकारे केसांना लावा कांद्याचा रस
खोबरेल तेलाची घ्या मदत
केसांना कांद्याचा रस लावण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करू शकता. यासाठी एक बाऊल घ्या. त्या बाऊलमध्ये खोबरेल तेल व कांद्याचा रस समप्रमाणात मिसळा. आता हे मिश्रण टाळूच्या मुळापर्यंत लावा. अर्धा तास हे मिश्रण तसेच केसांवर लावून ठेवा. अर्धा तास झाल्यानंतर केस सामान्य पाण्याने धुवा.
मेहेंदीमध्ये मिक्स करा कांद्याचा रस
पांढऱ्या केसांची समस्या सोडवण्यासाठी मेहेंदीसोबत कांद्याचा रस फायदेशीर ठरेल. यासाठी एका बाऊलमध्ये मेहेंदी घ्या. त्यात चहा पावडरपासून तयार पाणी व कांद्याचा रस मिसळा. आता हे मेहेंदीचे मिश्रण केसांवर लावा. काही वेळानंतर केस सामान्य पाण्याने धुवा. यामुळे केस नैसर्गिकरित्या काळेभोर होतील.
आवळ्याच्या रसाचे करा वापर
केसांची निगा राखण्यासाठी आवळ्याचा रस मदतगार ठरेल. यासाठी एका बाऊलमध्ये आवळ्याचा रस आणि कांद्याचा रस समप्रमाणात मिसळा. आता हे मिश्रण केसांवर लावा. ३ तासानंतर केस पाण्याने धुवा. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातून दोनवेळा याचा वापर करा.