Lokmat Sakhi >Beauty > डोळ्यांभोवती काळी वर्तुळे खूपच वाढली? लावा ३ पदार्थांचा जादुई लेप, डार्क सर्कल्स होतील कमी

डोळ्यांभोवती काळी वर्तुळे खूपच वाढली? लावा ३ पदार्थांचा जादुई लेप, डार्क सर्कल्स होतील कमी

Beauty Tips For Dark Circles: डोळ्यांभोवती दिसून येणारी काळी वर्तुळे कमी करायची असतील तर हा घरगुती लेप वापरून बघा. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2023 06:13 PM2023-01-03T18:13:58+5:302023-01-03T18:14:58+5:30

Beauty Tips For Dark Circles: डोळ्यांभोवती दिसून येणारी काळी वर्तुळे कमी करायची असतील तर हा घरगुती लेप वापरून बघा. 

Magical home remedies for removing dark circles, How to get rid of dark circles? | डोळ्यांभोवती काळी वर्तुळे खूपच वाढली? लावा ३ पदार्थांचा जादुई लेप, डार्क सर्कल्स होतील कमी

डोळ्यांभोवती काळी वर्तुळे खूपच वाढली? लावा ३ पदार्थांचा जादुई लेप, डार्क सर्कल्स होतील कमी

Highlightsकाही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास डार्क सर्कल्स कमी होण्यास निश्चितच मदत होईल. 

जागरणं, खूप अधिक वेळ स्क्रिन बघत बसणं, अशक्तपणा, पाणी कमी पिणे अशा विविध कारणांमुळे डार्क सर्कल्स येतात. डार्क सर्कल्स घालविण्यासाठी आपण आहारातही बदल करणं गरजेचं आहे. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी योग्य प्रमाणात प्यायला हवं. तसंच हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळं हे देखील आपल्या आहारात असायला पाहिजे. आहारातून असे काही बदल करण्यासोबतच हा एक घरगुती उपायही (home remedies) करून बघा. डार्क सर्कल्स कमी होण्यात ( How to get rid of dark circles?) नक्कीच मदत होईल. 

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी उपाय
beauty__secrets_with_shalini या इन्स्टाग्राम पेजवर हा उपाय शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला केवळ ३ पदार्थांची गरज आहे.

फक्त १५ ते २० रुपयांत संक्रांत वाण म्हणून लुटता येतील अशा १० उपयोगी वस्तू.. बघा काय आवडतं
साहित्य
अर्धा टी- स्पून व्हॅसलिन
अर्धा टी स्पून कोरफडीचा गर किंवा जेल
अर्धा टी स्पून काॅफी पावडर

 

कृती
१. सगळ्यात आधी व्हॅसलिन, ॲलोव्हेरा जेल आणि कॉफी पावडर हे सगळे साहित्य एका वाटीत एकत्र करा आणि व्यवस्थित कालवून घ्या.

२. त्यानंतर रात्री झोपण्यापुर्वी हा लेप डोळ्यांभोवती लावा आणि २ ते ३ मिनिटे गोलाकार पद्धतीने डोळ्यांभोवती मसाज करा.

विझलेली मेणबत्ती पुन्हा पेटविण्याची ही भन्नाट युक्ती तुम्ही पाहिली का? बघा तरुणीचा व्हायरल व्हिडिओ 

३. मालिश करताना खूप रगडून, चोळून करू नका. हळूवार हाताने मालिश करावी. 

४. मसाज झाल्यानंतर एखाद्या स्वच्छ मऊ कपड्याने किंवा कापसाने लेप पुसून घ्या. 

५. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. 

६. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास डार्क सर्कल्स कमी होण्यास निश्चितच मदत होईल. 

 

Web Title: Magical home remedies for removing dark circles, How to get rid of dark circles?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.