सध्याच्या काळात वाढते प्रदूषण, धूळ, माती, उन्हाचा तडाखा यांचे प्रमाण वाढले आहे. घराबाहेर पडताना आपली त्वचा टॅन होऊ नये म्हणून आपण सनस्क्रीन लावूनच घराबाहेर पडतो. त्वचेसाठी सनस्क्रीनचा वापर करताना आपण शक्यतो ते चेहऱ्याच्या त्वचेवर लावतो. मात्र कित्येकदा हातापायांच्या त्वचेकडे आपले दुर्लक्ष होते. शक्यतो चेहऱ्याच्या त्वचेला सनस्क्रीन लावल्यानंतर आपण हात पायांना सनस्क्रीन लावणे विसरतो आणि तसेच घराबाहेर पडतो. यामुळेच कडक उन्हाच्या तडाख्याने हातापायांची त्वचा काळी पडते, ही त्वचा अशीच काळी पडून नंतर त्वचेचे टॅनिंग वाढते(Best Tan Removal Face Packs To Remove Sun Tan).
हातापायाची त्वचा काळी पडली की हे त्वचेवरील टॅनिंग काढणे कठीण होते. असे त्वचेवरील टँनिंग काढण्यासाठी अनेकजणी पार्लरला जाऊन टॅनिंग काढण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्स करतात. परंतु प्रत्येकवेळी या टॅनिंग काढण्याच्या महागड्या ट्रिटमेंट्स करणे शक्य होतेच असे नाही. त्याचबरोबर सध्याच्या बिझी लाइफस्टाइलमुळे प्रत्येकवेळी पार्लरला जाण्याइतका वेळ असतोच असे नाही. अशावेळी आपण काही साधे सोपे उपाय करून हातापायाचे टँनिंग घरच्या घरी काढू शकतो. घरच्या घरी हातापायाचे टॅनिंग काढून टाकण्यासाठी एक सोपा उपाय पाहूयात(Magical Mask to Remove Sun Tan Instantly from Face & Body).
टॅनिंग काढून टाकण्यासाठी मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. बेसन - २ टेबलस्पून
२. हळद - १/२ टेबलस्पून
३. मध - १/२ टेबलस्पून
४. पाणी - आवश्यकतेनुसार
१ चमचा अळशी - १ चमचा तांदुळाचे पीठ, उपाय साधा- चेहऱ्यावरून तुमचं वय ओळखता येणार नाही...
टॅनिंग मास्क कसा तयार करावा ?
१. एका छोट्या बाऊलमध्ये बेसन, हळद, मध घेऊन ते सगळे जिन्नस एकत्रित करुन त्याची थोडी पातळ पेस्ट तयार करुन घ्यावी.
२. या पेस्टमध्ये गरजेनुसार पाणी घालून पेस्ट व्यवस्थित मिक्स करुन घ्यावी.
या टॅनिंग मास्कचा वापर कसा करावा ?
आता हा टॅनिंग मास्क हातापायांच्या किंवा टँनिंग झालेल्या त्वचेच्या भागावर लावून घ्यावा. १५ ते २० मिनिटे हा मास्क तसाच त्वचेवर लावून ठेवावा. हा टॅनिंग मास्क संपूर्ण सुकेपर्यंत त्वचेवर तसाच राहू द्यावा. त्यानंतर थंड पाण्याने हा मास्क स्वच्छ धुवून घ्यावा. टॅनिंग मास्क धुतल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावून घ्यावे. आठवड्यातून किमान ३ वेळा हा टॅनिंग मास्क त्वचेला लावल्यास त्वचेचे टॅनिंग काढून टाकण्यास मदत मिळते.