Join us  

कांद्याची सालं फेकू नका, केस गळणं कायमचं बंद करायचं असेल तर हा घ्या १ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2024 10:30 AM

Magical Onion Peel Hair Toner for double hair growth : फायदे वाचाल तर कायम साठवून ठेवाल कांद्याची साल, पाहा याचे भन्नाट वापर..

खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणारा कांदा फक्त फोडणीसाठी नसून, केसांसाठीही फायदेशीर ठरते. फोडणीमध्ये कांदा घालताच पदार्थाची चव वाढते. कांद्याची भाजी, भजी, पराठा आपण खाल्लाच असेल. कांदा वापरून आपण त्याचे साल फेकून देतो (Onion Peels for Hairs). पण कांद्याची फेकून देण्याऐवजी आपण त्याचा वापर केसांसाठीही करून पाहू शकता (Hair Growth). कांद्याच्या सालीमध्ये विविध गुणधर्म असतात.

सालीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. शिवाय त्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करतात (Hair Care Tips). जर केस कायम गळत असतील तर, आपण कांद्याच्या सालीचा टोनर तयार करू शकता. या टोनरमुळे केसांची मुळं अधिक घट्ट होतील(Magical Onion Peel Hair Toner for double hair growth).

होममेड हेअर टोनर तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

कांद्याची साल

कलौंजी

काळ्याकुट्ट अंडरआर्म्स? १ चमचाभर टूथपेस्टची पाहा कमाल; काही दिवसात दिसेल फरक

पाणी

कृती

एका भांड्यात कपभर कांद्याची साल घ्या. त्यात एक चमचा कलौंजी आणि पाणी घाला. भांडं गॅसवर ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करून पाणी एका ग्लासमध्ये गाळून घ्या. पाणी थंड झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. अशा प्रकारे हेअर टोनर वापरण्यासाठी रेडी.

ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? ५ रुपयांच्या कडीपत्त्यात मिसळा एक काळं पाणी, शायनिंग केसांच सुपर सिक्रेट..

केसांना हेअर टोनर लावण्याची योग्य पद्धत

केस धुण्याच्या अर्धा तास आधी विंचरून घ्या. नंतर हेअर टोनर स्काल्प आणि केसांना लावा. अर्धा ते ४५ मिनिटानंतर केस धुवून घ्या. आपण याचा वापर आठवड्यातून ३ वेळा करू शकता. याच्या वापरामुळे केस दाट होतील, शिवाय केसांची योग्य वाढ होईल. केस गळतीपासून सुटका हवी असेल तर, याचा वापर आठवड्यातून ३ वेळा न चुकता करा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स